आयपीएल २०२६ मध्ये एमआय: पर्स, स्लॉट, आपल्याला कशाची गरज आहे - तुम्ही जाणून घेणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट

लिलावाचा दिवस जवळ आलाय, पलटन! 💙

आयपीएल २०२६ लिलावाला फक्त एकच दिवस शिल्लक असताना आपला थिंक टॅंक तयारीत आहे, स्प्रेडशीट्स उघडल्या आहेत आणि प्लॅन्स तयार सुरू आहेत. या प्री प्रॉडक्शनचा टप्पा आहे जिथे धोरणे तयार केली जातात, कॉम्बिनेशन्स तपासल्या जातात आणि कुठलाही निर्णय उत्तम परिणाम घेऊन येऊ शकतो.

आता आपली मूळ टीम ठरलेली आहे आणि शेवटचे काही मेंबर्स एड व्हायचे आहेत. त्यामुळे मिशन जवळपास स्पष्ट आहे. अशी एक टीम तयार करायची जी प्रचंड मेहनत करून सहावा विक्रमी आयपीएल क्राऊन आपल्यासाठी घेऊन येईल.

याशिवाय, आपल्या लाडक्या पलटनला तपशिलांबाबत आणि अबूधाबीला होणाऱ्या आपल्या कार्यक्रमाबाबत काही प्रश्न असतील असे वाटते.

पण काळजी करू नका. तुम्हाला आयपीएल २०२६ लिलावाबाबत जाणून घेणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे कळेल. तारखांपासून ते नियमांपर्यंत आणि पर्सच्या तपशिलांपर्यंत. चला तर मग...

आयपीएल २०२६ लिलाव कधी सुरू होईल?

आयपीएल २०२६ चा लिलाव १६ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता सुरू होईल.

आणि कोणत्या ठिकाणी?

आयपीएल २०२६ चा लिलाव एतिहाद सेंटर, अबूधाबीमध्ये होईल.

या वेळी किती खेळाडू सहभागी होतील?

आयपीएल २०२६ लिलावात १३९० क्रिकेटपटूंची नोंदणी झाली असून त्यातील ३५० निश्चित झाले आहेत.

या ३५० खेळाडूंपैकी २४० खेळाडू भारतीय आहेत आणि ११० खेळाडू परदेशी आहेत. याशिवाय ११२ खेळाडू कॅप्ड असून २३८ खेळाडू अनकॅप्ड आहेत.

पायाभूत किमतीचे विश्लेषण कसे आहे?

मूळ किंमत (रूपयांमध्ये)

खेळाडूंची संख्या

२.०० कोटी

४०

१.५० कोटी

१.२५ कोटी

१.०० कोटी

१७

७५ लाख

४२

५० लाख

४० लाख

३० लाख

२२७

एकूण

३५०

एमआयला किती स्लॉट्स भरायचे आहेत?

सध्या २०२६ च्या मोहिमेपूर्वी आपल्या संघात २० खेळाडू आहेत. त्यामुळे, २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण करण्यासाठी पाच खेळाडू आणता येतील आणि त्यात परदेशी खेळाडूसाठी एक जागा शिल्लक राहील.

एमआयकडे किती पर्स आहे?

आपण २.७५ कोटी रूपयांसह लिलावात सहभागी होणार आहोत.

खेळाडूंच्या व्यापारादरम्यान एमआयच्या उपक्रमांबाबत आम्हाला सांगा.

व्यापारादरम्यान आम्ही तीन खेळाडू आणले. त्यात शार्दुल ठाकूर, शेरफाने रूदरफोर्ड आणि मयंक मार्कंडे यांचा समावेश आहे. दरम्यान जलदगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपर जायंट्सकडे गेला.

कोणत्या खेळाडूंचा लिलाव आधी होईल?

कॅप्ड फलंदाजांमधून सर्वप्रथम संभाव्य खेळाडूंचा शोध घेतला जाईल. पहिल्या ७० खेळाडूंची निवड पूर्ण झाल्यानंतर, संघांना त्यानंतरच्या जलद फेरीत विचारात घेण्यासाठी एकूण पूलमधील न विकल्या गेलेल्या खेळाडूंची नावे सादर करण्यास सांगितले जाईल. यात कोणताही "मार्की खेळाडू" संच नाही.

या वेळी आरटीएम कार्ड आहे का?

या वेळी मिनी लिलाव असल्यामुळे फ्रँचायझींकडे राइट टू मॅच कार्ड वापरण्याची तरतूद नाही.

लिलाव कोण पार पाडणार आहे?

डब्ल्यूपीएल २०२६ मेगा लिलावादरम्यान जबाबदारी असलेल्या मल्लिका सागर यांच्याकडेच आयपीएल २०२६ च्या लिलावाची जबाबदारी असेल.

या वेळी पलटनसाठी काय आहे?

दर वेळच्या लिलावाप्रमाणेच आणखी एका तरूण खेळाडूचा शोध लावताना आमचा थिंक टॅंक दिसेल. ते या सीझनदरम्यान जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसतील.

**********

आयपीएल २०२६ लिलावासाठी तुमची शॉपिंग लिस्ट काय आहे ते कमेंट्समध्ये सांगा! 😉

आमचा थिंकटँक तुमच्या उत्तरांच्या प्रतीक्षेत आहे … 👀