आयपीएल २०२६ वेळापत्रक #AalaRe! मुंबई, मुंबई!!!!

पलटन, स्क्रोल करू नका! शक्यशक्यतांचा फेरा आता संपला आहे. आयपीएल २०२६ चे लीगच्या पहिल्या २० सामन्यांसाठीचे वेळापत्रक आले आहे आणि विश्वास ठेवा, हे शेड्यूल एकदम कडक आहे. त्यामुळे आता तुमचे फीड दर दोन मिनिटांनी रिफ्रेश करणे किंवा तुमच्या भिडूला व्हॉट्सएपवर विचारण्याची गरज नाही. मुंबई इंडियन्सचा चषक जिंकण्याचा मार्ग आता खुला झाला आहे.

तर पहिल्या टप्प्यात एमआयचे चार सामने असणार आहेत. आपल्याला मैदानावर धमाल आणि सामना नसताना टशन पाहायला मिळेल. त्यामुळे तुमही सीटवर उड्या मारतच राहाल.

पहिल्या सामन्यात आपण कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध खेळणार आहोत. हा सामना २९ मार्च रोजी वानखेडेवर होईल. हार्दिक कुंग फू पांड्या आणि त्याच्या मुंभाईजसाठी हा प्रतिस्पर्धी नेहमीचा आहे. आणि गंमत म्हणजे आपल्याला त्यांच्याविरूद्ध सामने जिंकायला आवडतात. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सविरूद्ध दोन सामने खेळल्यानंतर आपण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध शत्रुत्व निभावण्यासाठी सज्ज आहोत.

घरच्याइतका आनंद दुसरीकडे कुठेही मिळत नाही असे म्हणतात. ही भावनाच अलग आहे. 🥰 तुम्ही नॉर्थ स्टँडवर असा किंवा गरवारेमध्ये असा. यंदाच्या वर्षाची व्हाइब मस्त जबरदस्त असणार आहे. आपल्यासारखा सामना कुठल्याच शहरात साजरा होत नाही आणि विकेट पडल्यानंतर इतर कोणत्याही स्टेडियमवर गर्जना होत नाही. तर आपल्या बालेकिल्ल्यात केकेआरविरूद्ध पहिल्या सामन्यात आपण एमआयचा राडा घालणार आहोत.

आता वाट कसली बघताय! पूर्ण लिस्ट बघा, तुमचे कॅलेंडर्स मार्क करा आणि तुमच्या फोनमध्ये प्रत्येक गोष्ट नोंदवून ठेवा. ब्लू अँड गोल्ड स्टेडियमवर आले की काहीही बहाणे चालणार नाहीत.

आपल्या सहाव्या स्टारसाठी लढाई सुरू होतेय!!!!

आयपीएल २०२६ साठी मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक

प्रतिस्पर्धी

तारीख

वेळ

स्थान

कोलकाता नाइट रायडर्स

२९/३/२०२६

सायं. ७.३०

मुंबई

दिल्ली कॅपिटल्स

४/४/२०२६

सायं. २.३०

दिल्ली

राजस्थान रॉयल्स

७/४/२०२६

सायं. ७.३०

गुवाहाटी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

१२/४/२०२६

सायं. ७.३०

मुंबई