IPL Match 10 | MIvLSG पूर्वावलोकन: मिशन बि.लि.व्ह.
पलटन, आता वानखेडेवर पेनल्टीटाइम सामन्याची वेळ आहे. मुंबई इंडियन्स ४ मे २०२६ रोजी लखनौ सुपर जायंट्सचा सामना करणार आहे. आपल्यासाठी आपले वर्चस्व दाखवण्याची, लय सांधण्याची आणि एमआय संस्कृती काय असते- निर्भय, प्रभावी आणि मेहनती हे दाखवण्याची संधी आहे. लय एका झटक्यात गवसू शकते. खेळाडू मैदानात सामन्याचा ताबा घेतात तेव्हा उत्तम खेळ खेळला जाऊ शकतो. चाहते आपला लाडका ब्लू अँड गोल्ड परिधान करतील तेव्हा ऊर्जा, उत्साह आणि रोमांच हे सर्वच पाहायला मिळेल. 🔥 भरपूर धमाल, उत्साह आणि बदल घडवणारा खेळ पाहण्यासाठी तयार व्हा. 💪
एमआयने मागच्या काही सामन्यांमध्ये एलएसजीशी सामना केला तेव्हा घडलेल्या गोष्टींच्या सुंदर आठवणी जागृत करूया.
नमनकडून आयपीएलच्या स्टेजवर आगमनाची घोषणा (२०२४) 👊
तरूण खेळाडू नमन धीरने केलेली अप्रतिम फलंदाजी. त्याने २८ चेंडूंमध्ये नाबाद ६२ धावा फटकावल्या. त्यात त्याने चार चौकार आणि पाच षट्कार मारून क्रिकेटजगताला आश्चर्यचकित केले होते. वानखेडेवर मधल्या फळीत एलएसजीविरूद्ध खेळताना त्याने आत्मविश्वासाने फटकेबाजी केली होती. त्याच्यातली चुणूक तेव्हाच दिसली होती.
*****
मुंबईचा राजा, हिटमॅन शर्माचा विंटेज आणि क्लासिक टच (२०२४) 👑
रोहित शर्माने वानखेडेवर जी काही धमाल केली ती बघण्यासारखी होती. त्याने ३८ चेंडूंमध्ये ६८ धावा करताना १० चौकार आणि तीन षट्कार ठोकले. त्याने सामन्यावर नियंत्रण ठेवून गॅप्समधून अचूक फटके मारले. इनिंग्स सुरू करताना रोहितने आपला जबरदस्त क्लास दाखवून अचूकपणे पाठलाग पूर्ण केला.
*****
एचपीएची फाइव्ह स्टार गोलंदाजी, लखनौ (२०२५) ✋
हार्दिक पांड्याने आघाडी घेऊन नेतृत्व केले. त्याने आपल्या चार ओव्हर्समध्ये ५/३६ विकेट्स घेतल्या. त्याने एडेन मार्क्रम, निकोलस पूरण, ऋषभ पंत, डेव्हिड मिलर आणि आकाश दीप यांच्या महत्त्वाच्या विकेट्स या वेळी घेतल्या. अत्यंत स्मार्टपणे, आक्रमकतेने आणि चेंडूवर नियंत्रण ठेवून त्याने अप्रतिम कामगिरी केली. त्यानंतर त्याने १६ चेंडूंमध्ये २८ धावाही केल्या. दुर्दैवाने आपण जिंकू शकलो नाही.
*****
वानखेडेवर ईएसए डेला पलटलेली स्क्रिप्ट (२०२५) 🙌
ईएसए दिनाच्या सामन्यात ब्लू अँड गोल्डचा समुद्र वेगळाच वाटतो. मैदानावर आणि बाहेरही आपल्याला हृदयस्पर्शी क्षण दिसतात. कारण मुले मुंबई इंडियन्सचा गौरव करत असतात. हा घरच्या खेळपट्टीवरचा सामना कधीही निराश करत नाही आणि मागील वर्षी आपण ५४ धावांनी जिंकल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाला उधाण आले होते.
एमआयने सर्वप्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या (५४) दणकेबाज खेळामुळे २० ओव्हर्समध्ये २१५/७ अधी कामगिरी केली. त्याने संपूर्ण मैदानात चेंडू टोलवला होता. विल जॅक्सनेही या सामन्यात २१ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल एलएसजीने २० ओव्हर्समध्ये १६१ धावा केल्या. बुमराहने चार विकेट्स घेतल्या (४/२२) तर पीओटीएम विल जॅक्सने फक्त दोन ओव्हर्समध्ये २/१८ विकेट्स घेतल्या.
*****
आकडेवारी
|
खेळलेले सामने (एकूण) |
८ |
|
एमआयने जिंकले |
२ |
|
एलएसजीने जिंकले |
६ |
|
खेळलेले सामने (वानखेडेवर) |
३ |
|
एमआयने जिंकले |
१ |
|
एलएसजीने जिंकले |
२ |
| एमआय | आकडेवारी | एलएसजी |
| सूर्यकुमार यादव (२१५ धावा) | सर्वाधिक धावा | केएल राहुल (२८९ धावा) |
| हार्दिक पांड्या (७ विकेट्स) | सर्वाधिक विकेट्स | रवी बिष्णोई (८ विकेट्स) |
ब्लू प्रिंट साधी सोपी आहे... विश्वास ठेवा, लढा द्या आणि जिंका! 💙