आयपीएल सामना २ | DCvMI: दुष्टचक्र भेदले, आता वेग पकडूया

मुंबई इंडियन्सने सामने उत्तमरित्या संपवण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवले आहे. विशेषतः मागील काही वर्षांत त्यांनी दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध दणदणीत कामगिरी केली आहे. पलटन, आम्ही हे सामने उत्तमरित्या कसे विजयी करायचे याचा शोध घेतला आहे. प्रचंड दबाव असतो तेव्हा ब्लू अँड गोल्डमधील खेळाडू म्हणतात... बिलिव्ह. आयपीएल चषक पाच वेळा जिंकणाऱ्या या टीमने मैदानात कायमच उत्तम कामगिरी केली आहे. चार दिवसांपूर्वी टीमने आपल्या आयपीएल २०२६ च्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. आमचे हिरोज आमच्या दुसऱ्या सामन्यात डीसीशी खेळण्यासाठी मैदानात उतरत असताना चाहत्यांना ही खास गोष्ट आहे हे माहीत आहे. आपला पुढचा सामना जवळ येत असताना जिंकण्याची ऊर्मी मनात ऊभारू लागली आहे.

दिल्लीविरुद्ध सामन्यांतील मुंबई इंडियन्सचे काही अविस्मरणीय क्षण पाहूया.

यॉर्क किंग मलिंगाच्या पाच विकेट्स (२०११)

पीओटीएम लसिथ मलिंगाने २०११ मध्ये आपल्या चार ओव्हर्समध्ये (५/१३) अशी कामगिरी केली आणि एमआयसाठी आपल्या करियरमधील सर्वोत्तम आकडेवारी पूर्ण केली. त्याने तत्कालीन दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना करताना फक्त ३.५४ च्या सरासरीने कामगिरी करून आपल्या खास यॉर्कर्स आणि संथ गोलंदाजीने पाचपैकी चार विकेट्स घेतल्या.

*****

पॉलीचा ब्लू अँड गोल्डमध्ये शक्तिशाली खेळ (२०१७)

२०१७ मध्ये कायरन पोलार्डने फक्त ३५ चेंडूंमध्ये तब्बल ६३ धावा केल्या. त्यात त्याने पाच चौकार आणि चार षट्कारांच्या मदतीने ही कामगिरी केली. त्यामुळे एमआयला २० ओव्हर्समध्ये तब्बल २१२/३ धावा नोंदवता आल्या. डेअरडेव्हिल्स पूर्णपणे भांबावून गेले होते. ब्लू अँड गोल्ड टीमने १४६ धावांनी दणदणीत विजय मिळवून प्लेऑफ्समध्ये धडक मारली होती.

*****

दुबईतील आयपीएल फायनल सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सनी विजय (२०२०)

पीओटीएम ट्रेंट बोल्टने आपल्या ४ ओव्हर्समध्ये मधल्या फळीत (३/३०) ची उत्तम कामगिरी करून डीसीला २० ओव्हर्समध्ये १५६/७ वर रोखले. ब्लू अँड गोल्ड संघाने आठ चेंडू शिल्लक असताना या धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माच्या ५ चौकार आणि ४ षट्कारांच्या मदतीने ५१ चेंडूंमधील ६८ धावांची सलामीमुळे हे शक्य झाले.

*****

एमआयने शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक सामन्यात विजय नोंदवला (२०२३)

११ एप्रिल २०२३ रोजी पलटनने शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेला रोमांचक सामना बघितलाय. या सामन्यात २० ओव्हर्समध्ये १७३/४ धावांचा पाठलाग करताना एमआयने ६ विकेट्सनी विजय मिळवला. पीओटीएम रोहित शर्माची ६५(४५) ची कामगिरी ज्यात ६ चौकार आणि ४ षट्कार फटकावले. त्यामुळे सामना ताब्यात आला. आपल्या लाडक्या तिलकनेही उत्तम खेळताना फक्त २९ चेंडूंमध्ये ४९ धावा नोंदवल्या. त्या सीझनमध्ये एमआयचा हा पहिला विजय होता.

*****

मुंबई इंडियन्सने पराभवाच्या गर्तेतून विजय खेचून आणला (२०२५)

हा दिल्ली कॅपिटल्सच्या हातातला सामना होता. परंतु पलटनने खूप प्रार्थना केल्या होत्या आणि त्या ऐकल्या गेल्या. ब्लू अँड गोल्ड संघाने २०५/५ धावा करून १२ धावांनी विजय नोंदवला. सामन्यात काहीतरी गोंधळ होणार असे वाटत असतानाच जसप्रीत बुमराच्या हातात चेंडू आला. बूमची ती १९ वी ओव्हर अत्यंत खतरनाक होती. त्याने आक्षरशः तीन रनआऊट केले. जेबीच्या ओव्हरने सामना पालटला. एमआयने जगाला दाखवून दिले की तणाव असला तरी ते उत्तम खेळतात.

*****

आकडेवारी

खेळलेले सामने

३७

एमआयने जिंकले

२१

डीसीने जिंकले

१६

 

एमआय आकडेवारी डीसी
रोहित शर्मा (८७२ धावा) सर्वाधिक धावा ऋषभ पंत (४०२ धावा)
जसप्रीत बुमराह (३० विकेट्स) सर्वाधिक विकेट्स अमित मिश्रा (१९ विकेट्स)

 

पलटन, ४ एप्रिल २०२६ रोजी एमआय आणि डीसीच्या सामन्यात धमाल होणार आहे.