IPL Match 6 | GTvMI: केम छो, अमदावाद! एमआय #AalaRe
मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत होतो तेव्हा खूप धमाल असते. 🎉 एक रोमांच निर्माण करणारा हा सामना आणि त्यातला उत्साह आपल्या सर्वांना माहीत आहे. मैदानात दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा चाहत्यांच्या अंगावर शहारा उभा राहतो. प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट महत्त्वाची असते. प्रत्येक सीमारेषा जीवापाड जपली जाते. 👏 प्रत्येक शतक साजरे केले जाते. प्रत्येक षट्कार पलटनच्या जीवाला थंडावा देतो. 💙
तर अहमदाबादमध्ये आणखी एका हाय व्होल्टेज सामन्यासाठी सज्ज होऊया. इथे २० एप्रिल २०२६ रोजी आपले मेन इन ब्लू अँड गोल्ड जीटीसोबत खेळणार आहेत. आपल्या पोरांनी सर्वोत्तम कामगिरी केलेला प्रत्येक सामना आठवण्याची ही वेळ आहे. 👇
रोची धमाल, तिलककडून रोमांचक कामगिरी (२०२२)
आपल्या लाडक्या टीव्हीने ६ मार्च २०२२ रोजी फक्त १६ चेंडूंमध्ये १३१.२५ च्या सरासरीने दोन चौकारांच्या मदतीने २१ धावा करून ब्रेबॉर्न स्टेडियम गाजवले होते. त्याने क्रिकेटजगताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. पलटनला कळले एक नवीन सुपरहिरोचा उदय झाला आहे. अंतिमतः जीटीचा पराभव करत एमआयने पाच धावांनी हा सामना जिंकला.
*****
सूर्याची शंभरी (२०२३)
पीओटीएम सूर्यकुमार यादवच्या पहिल्यावहिल्या आयपीएल शतकाने आपला बालेकिल्ला वानखेडेवर सर्वांच्या डोळ्यांसमोर तारे चमकवले. एमआयने दोन विकेट्स गमावल्यानंतर त्याने सामना ताब्यात घेतला. त्याने फक्त ४९ चेंडूंमध्ये नाबाद १०३ धावा करताना ११ चौकार आणि सहा षट्कार ठोकले. त्याचा प्रत्येक स्कूप आणि फ्लिक मैदानात एखाद्या कॅनव्हासवर रंगाचे फटकारे मारल्यासारखा वाटत होता. जीटीचा संघ पूर्ण भांबावून गेला होता.
*****
कठीण सामन्यात उपयुक्त ठरलेल्या हार्दिकच्या २/२९ विकेट्स (२०२५)
काही परफॉर्मन्सेसकडे आपोआप लक्ष वेधले जाते. जीटी दुसऱ्या बाजूला धावा अक्षरशः कुटत असताना एचपीने चार ओव्हर्समध्ये २/२९ अशी कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले. दुर्दैवाने एमआयचा या सामन्यात कठीण पराभव झाला. 🎯
*****
वानखेडेवर विल चमकला- सूर्या तळपला (२०२५)
विल जॅक्सने आपल्या स्टाइलमध्ये ३५ चेंडूंमध्ये ५३ धावा फटकावल्या तर सूर्याने २४ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या. त्यामुळे एमआयला १५५/८ पर्यंत पोहोचता आले. या सामन्याचा निर्णय डीएलएस पद्धतीने झाला. त्यात आपल्याला पराभव पत्करावा लागला.
*****
रोहितने जबाबदारी घेतली आणि उत्तम कामगिरी केली (२०२५)
मोठ्या सामन्यांसाठी हिरोजनी चमकदार कामगिरी करावी लागते आणि आपला लाडका मुंबईचा राजा मुल्लनपूरमध्ये मागील वर्षी एलिमिनेटर सामन्यात अशीच कामगिरी करून गेला. पीओटीएम रोहितने नऊ चौकार आणि चार षट्कारांच्या मदतीने ८१(५) धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सला २० धावांनी विजय मिळवून दिला.
*****
आकडेवारी
|
खेळलेले सामने |
८ |
|
एमआयने जिंकले |
३ |
|
जीटीने जिंकले |
५ |
|
एमआय |
आकडेवारी |
जीटी |
|
सूर्यकुमार यादव (३१६ धावा) |
सर्वाधिक धावा |
शुभमन गिल (३५६ धावा) |
|
जसप्रीत बुमराह (६ विकेट्स) |
सर्वाधिक विकेट्स |
राशीद खान (११ विकेट्स) |
तर चला भेटूया आता मैदानात...🔥