IPL Match 8 | MIvSRH पूर्वावलोकन: दुसऱ्या टप्प्यात पुनरागमनाचे वादळ

पलटन, आयपीएल २०२६ चा दुसरा टप्पा सुरू होत असताना एक नवीन दृष्टीकोन घेऊन पुढे जाऊया. ✊ लीग टप्प्यातले आणखी सात सामने बाकी असताना आपल्या टीमच्या पाठीशी जल्लोषाने आणि सकारात्मकतेने उभे राहूया. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना २९ एप्रिल २०२६ रोजी वानखेडेवर सनरायझर्स हैदराबादसोबत होणार आहे. मागील काही वर्षांत हा सामना खूप खास राहिला आहे. एक ओव्हर, एक चेंडू, मोठी इनिंग आणि मग नूर पालटणे. वेगवेगळे सीझन्स, आता पुढची पिढी आघाडीवर यायला तयार आहे. पण सामन्याचे संतुलन बिघडू लागते तेव्हा एक नवीन हिरो उदयास येतो आणि तो त्या क्षणावर मात करतो. अंतिमतः सामना अडकलेला असतो, चाहते अत्यंत टेन्शनमध्ये आलेले असतात तेव्हा सामना पालटतो. नजर हटी दुर्घटना घटी.. 💙

ऑरेंजमधल्या खेळाडूंसोबत ब्लू अँड गोल्डचा संघ भिडण्यापूर्वी चला जुन्या आठवणी काढूया जिथे एमआयचा संघ विजयी झाला आणि आपल्या हृदयाचे ठोके वाढले. 🥶

वानखेडेवर मास्टरचा फायनल टच आणि पोलार्डची मेजवानी (२०१३)

संपूर्ण जगाचा लाडका खेळाडू असलेल्या सचिन तेंडुलकरने ३८ धावा करून आपल्या आयपीएल प्रवासातील शेवटचा सामना खेळला. त्यामुळे बाकी फलंदाजांनाही त्साह आला. त्यानतंर कायरन पोलार्ड आला आणि त्याने नाबाद ६६(२७) धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि आठ षट्कार ठोकले. त्याच्या या हल्ल्यामुळे प्रतिस्पर्धी संघ घाबरून गेला. एमआयने अत्यंत रोमांचक सामन्यात १९.३ ओव्हर्समध्ये १८४/३ असा पाठलाग पूर्ण केला.

*****

सुपर ओव्हर फिनिशमध्ये बूमच्या यॉर्करची जादू (२०१९)

हा सामना हातातून निसटता निसटता आपल्या खिशात येऊन पडला होता. मेन इन ब्लूनी अत्यंत गरज असताना परिस्थिती हुशारीने हाताळली होती. सुपर ओव्हरमध्ये नऊ धावांची गरज असताना पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी विजयश्री खेचून आणली. त्यापूर्वी एमआय आणि एसआरएच या दोन्ही संघांनी २० धावांमध्ये १६२ धावा केल्या होत्या. क्विंटन डे कॉकने ५८ चेंडूंमध्ये नाबाद ६९ धावा केल्या तर पीओटीएम जसप्रीत बुमराहने चार ओव्हर्समध्ये (२/३१) विकेट्स घेतल्या.

*****

कमी धावांच्या रोमांचक सामन्यात पोलार्डचा अष्टपैलू खेळ (२०२१)

चाहत्यांना चेन्नईत कायरन पोलार्ड शो पाहायला मिळाल. त्याने आधी २२ चेंडूंमध्ये एक चौकार आणि तीन षट्कार मारून नाबाद ३५ धावा केल्या. त्यानंतर त्याने उत्तम गोलंदाजी करून दोन ओव्हर्समध्ये फक्त १० धावा दिल्या. आपण हा सामना १३ धावांनी जिंकला.

*****

सूर्यादादाची सुपला सेंच्युरी (२०२४)

आपला दादा सूर्याने ५१ चेंडूंमध्ये नाबाद १०२ धावा फटकावताना १२ चौकार आणि सहा षट्कार ठोकले. त्यामुळे मेन इन ब्लूचा संघ १७.२ ओव्हर्समध्ये १७४/३ धावांचा पाठलाग करून सहजपणे विजयी झाला. सुरूवातीला हार्दिकनेही चार ओव्हर्समध्ये ३/३१ विकेट्स घेतल्या.

*****

ट्रेंट बोल्टचा बोल्ड खेळ- सूर्याची स्टायलिश फिनिश (२०२५)

पीओटीएम या वेळी उत्तम गोलंदाज आणि पीओटीएम ठरला. त्याने चार औव्हर्समध्ये ४/२६ धावा केल्या आणि एसआरएचला २० ओव्हर्समध्ये १४३/८ मध्ये गुंडाळले. त्यानंतर रोहित शर्माने फलंदाजीत वर्चस्व गाजवून ७०(४६) धावा केल्या तर स्कायने फक्त १९ चेंडूंमध्ये ४० धावा करून स्टायलिश फिनिश केली. आपण सामना सात विकेट्सनी जिंकलो.

*****

आकडेवारी

खेळलेले सामने (एकूण)

२५

एमआयने जिंकले

१४

एसआरएचने जिंकले

१०

बरोबरीत

१ (एमआयकडून सुपर ओव्हरमध्ये विजय)

 

खेळलेले सामने (वानखेडेवर)

१०

एमआयने जिंकले

एसआरएचने जिंकले

बरोबरीत

१ (एमआयकडून सुपर ओव्हरमध्ये विजय)

 

एमआय

आकडेवारी

एसआरएच

रोहित शर्मा (५३५ धावा)

सर्वाधिक धावा

डेव्हिड वॉर्नर (५२४ धावा)

जसप्रीत बुमराह (१९ विकेट्स)

सर्वाधिक विकेट्स

भुवनेश्वर कुमार (२० विकेट्स)

 

पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स आणि एसआरएच आमनेसामने येणार आहेत. ढगात लायटिंग नक्की होईल. एक नवीन दिवस आणि तीच आशा... एमआयचे पुनरागमन! 💙