जस प्रीटी परफेक्ट: एमआयने २०१३ मध्ये बुमराहला साइन केलं तो दिवस

मुंबई इंडियन्समध्ये आम्ही कायम खूप अभिमानाने बरेचदा म्हणत असतो, “आम्ही त्याला पहिल्यांदा पाहिलं.” आणि ३ फेब्रुवारी २०१३ रोजी ब्लू अँड गोल्डने एका मिस्टरी किडला आपल्या संघात आणलं. त्याची रन अपची अपारंपरिक शैली क्रिकेटच्या जगात अविस्मरणीय नाव ठरली. त्याचं नाव काय? जसप्रीत जसबीरसिंग बुमराह.

आपण त्या दिवसाची आठवण काढतोय. एक १९ वर्षाचा मुलगा. त्याच्या नावाभोवती ना प्रसिद्धीचं वलय होतं ना ओळख. परंतु जॉन राइटच्या नजरेला तो पडला. त्याची वेगळी पण अचूक रनअप जी वेगवान यॉर्कर्समध्ये बदलली. ते पाहून राइटला कळले की, अरे यार, हे असं काही मी कधीच पाहिलं नव्हतं.

हे विधिलिखित होतं का? हो! पूर्वीचा भारतीय प्रशिक्षक आणि नंतर एमआयमध्ये आलेल्या या खेळाडूने गुजरात आणि मुंबई यांच्यादरम्यान देशांतर्गत टी२० सामना दुसऱ्या एका खेळाडूसाठी पाहिला. परंतु नियती वेगळेच काम करते. त्याने बूम बूमला सामन्याच्या डेथ ओव्हर्समध्ये १२ यॉर्कर्स टाकण्याचा प्रयत्न करताना पाहिले. त्याने हे असे कधीच पाहिले नव्हते.

राइटला आश्चर्यचकित करणारी काही खास गोलंदाजी होती का? २०१३ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरात विरुद्ध मुंबई सामन्याच्या २० व्या ओव्हरमध्ये बुमराह आदित्य तारेला गोलंदाजी करत होता आणि त्याने एका उत्तम लांबीच्या बाउन्सरने मुंबईचा फलंदाज आणि गुजरातचा तत्कालीन कर्णधार व कीपर पार्थिव पटेलला बाद केले. राइटची नजर तात्काळ त्याच्यावर पडली.

त्यानंतर काय घडले? जॉन राइट पार्थिवकडे गेला (२००२ आणि २००५ दरम्यान टीम इंडियाचा खेळाडू आणि प्रशिक्षक हे नाते लक्षात घेता) त्याने बुमराहचे वर्णन सोप्या शब्दांत केले. “तो बूम आहे.” त्यातूनच हा कच्चा हिरा पैलू पाडल्यास चांगलाच झळाळून निघेल हे स्पष्ट झाले.

​मग पुढे काय? राइटने तात्काळ एमआयच्या निवड समितीला संपर्क सधला आणि सांगितले की “मला हा एक तरूण खेळाडू दिसलाय. आपण त्याला साइन करायला हवे.” अशा रितीने मुंभाईजनी पुढील काळात जगाला बूम स्ट्रक करणाऱ्या युगासाठी दरवाजे उघडले.

त्यानंतर ४ एप्रिल २०१३ रोजी महान जसप्रीत बुमराहने बॉलीवूडमध्ये शोभेल अशी एंट्री केली.

  • आरसीबीविरूद्ध खेळला
  • आरसीबी विरूद्ध एमआय सामन्यात विराट कोहलीला गोलंदाजी केली
  • चार चेंडूंमध्ये चार चौकार दिले
  • पाचव्या चेंडूवर त्याला एलबीडब्ल्यू केले.
  • त्याने हा सामना ३/३२ वर संपवला.

आता पाच चषक, २१९ आयपीएल विकेट्स आणि आपल्या ब्लू अँड गोल्डमध्ये सुंदर आठवणींसह जसप्रीत बूम बूम बुमराह मुंबई इंडियन्सचं काळीज तर आहेच पण एक महान खेळाडू आहे. त्याची गोष्ट टॅलेंटच्या एका सहज शोधातून सुरू झाली आणि त्याची यशाची भूक त्याला पुढे घेऊन आली.