५ अडचणी... १ उपाय - जसप्रीत बुमराह!

ओह... जस्सी फक्त उत्तम कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करतो, नाही का? 🔥

बूमने आपल्या घरापासून दूर आणखी एकदा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केल्यानंतर त्याने कोणत्याही भारतीयाकडून परदेशांतील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक पाच विकेट्सच्या कामगिरीसाठी महान कपिल देव यांच्याशी बरोबरी केली आहे. हे तर फारच उत्तम झालंय आणि बूमने ही कामगिरी अक्षरशः कमावली आहे!

खेळाडू

देशाबाहेर खेळलेल्या सामन्यांची संख्या

किती सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेतल्या

*जसप्रीत बुमराह

३४

१२

कपिल देव

६६

१२

*ईशांत शर्मा

६३

झहीर खान

५४

इरफान पठाण

१५

*कार्यरत खेळाडू

पिच, परिस्थिती किंवा जागा कुठलीही असो- भारताला कठीण परिस्थितीत सावरणारा बुमराहच आहे. मागील काही वर्षांत त्याने वेळोवेळी तणावपूर्ण परिस्थितीत उत्तम कामगिरी केली आहे. 👊

इंग्लंडचे ढगाळ आकाश? ऑस्ट्रेलियाची उसळणारी खेळपट्टी? दक्षिण आफ्रिकेचा वणवा? विंडीजचा आनंदोत्सव? बुमराहने या सर्वांवर प्रभुत्व मिळवले आहे. या माणसाकडे जवळजवळ प्रत्येक सामना जिंकणाऱ्या कामगिरीसाठी पासपोर्टवर स्टॅम्प आहे!🎯

आणि महत्त्वाचे काय हे ते माहित्ये का? त्याची ती खतरनाक धाव, लेसरसारखी अचूकता आणि पायाचे बोट चिरडणारे यॉर्कर फलंदाजांसाठी त्रासदायक आणि भारतीयांसाठी स्वप्न बनले आहेत. जेव्हा संघाला यशाची गरज असते तेव्हा कोण मदत करते? वेगळे काही सांगण्याची गरज नाही...☺️

आपण हे विसरू शकत नाही  - या फक्त काही सामान्य पाच विकेट्स नाहीत. त्याने खेळाचा मूड बदलला, मालिका पालटवली आणि विजयाचा आनंद दिला. 🫡 अशा प्रकारची कामगिरी ड्रेसिंग रूममध्ये साजरी होते आणि चाहते त्यांच्या लिविंग रूममध्ये नाचतात. आणि अंदाज लावा? त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

कपिल पाजींसोबत त्याचे नाव जोडले गेले असल्यामुळे आता एक गोष्ट स्पष्ट आहे- त्याच्या या सुवर्णकाळाचे आपण साक्षीदार आहोत. नेहमीप्रमाणेच पलटनमध्ये उत्साहाला उधाण आलेले आहे. 🙌

आता या टप्प्यावर त्याने पहिल्या सामन्यापासून घरापासून दूर खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये केलेल्या पाच विकेट्सच्या कामगिरीचा आढावा घेऊया.

तारीख

प्रतिस्पर्धी

स्थळ

सामना

आकडेवारी

जानेवारी २०१८

दक्षिण आफ्रिका

जोहान्सबर्ग

तिसरा कसोटी सामना, दुसरी इनिंग

५/५४

ऑगस्ट २०१८

इंग्लंड

नॉटिंगहम

तिसरा कसोटी, चौथी इनिंग

५/८५

डिसेंबर २०१८

ऑस्ट्रेलिया

मेलबर्ग

तिसरा कसोटी, दुसरी इनिंग

६/३३

ऑगस्ट २०१९

वेस्ट इंडिज

नॉर्थ साऊंड

पहिला कसोटी सामना, चौथी इनिंग

५/७

ऑगस्ट २०१९

वेस्ट इंडिज

किंग्स्टन

दुसरा कसोटी सामना, दुसरी इनिंग

६/२७

ऑगस्ट २०२१

इंग्लंड

नॉटिंगहम

पहिला कसोटी सामना, तिसरी इनिंग

५/६४

जानेवारी २०२२

दक्षिण आफ्रिका

केप टाऊन

तिसरा कसोटी सामना, दुसरी इनिंग

५/४२

जानेवारी २०२४

दक्षिण आफ्रिका

केप टाऊन

दुसरा कसोटी सामना, तिसरी इनिंग

६/६१

नोव्हेंबर २०२४

ऑस्ट्रेलिया

पर्थ

पहिला कसोटी सामना, दुसरी इनिंग

५/३०

डिसेंबर २०२४

ऑस्ट्रेलिया

ब्रिस्बेन

तिसरा कसोटी सामना, पहिला इनिंग

६/7६

डिसेंबर २०२४

ऑस्ट्रेलिया

मेलबर्न

चौथा कसोटी सामना, तिसरी इनिंग

५/५७

जून २०२५

इंग्लंड

लीड्स

पहिला कसोटी सामना, दुसरी इनिंग

५/८३