टी२०मध्ये ७०० सामने- लॉर्ड पॉलीची दैदिप्यमान कामगिरी!

टी२० क्रिकेटचा विषय येतो तेव्हा आपल्याला अनेक खेळाडू माहीत आहेत. अनेक महान खेळाडूही आहेत. आणि मग येतो तो कायरन पोलार्ड. 🙌

आपल्या तात्याने आता ७०० टी२० सामन्यांचा टप्पा पार केलाय. अगदी बरोबर वाचलंत तुम्ही. त्याच्या जवळपासही कुणी फिरकू शकत नाही. सातशे सामने.... अबाबाबा! तो फक्त अनुभवीच नाहीये तर त्याने संपूर्ण जगभरात मास्टर क्लास दिलेत, अत्यंत सुंदर आठवणी दिल्या आहेत आणि पॉवर हिटिंग म्हणजे काय याचे प्रदर्शन घडवले आहे.

लोकांना आ वासण्यास भाग पाडणाऱ्या सामन्यांपासून ते अप्रतिम गोलंदाजीपर्यंत, त्याच्या त्या अप्रतिम कॅचेस ज्यांनी तज्ञांना भौतिकशास्त्र नव्याने शिकायला भाग पाडले- पॉलीने हे सर्व साध्य केले आहे. तो फक्त सामन्यांमध्ये खेळलेला नाहीये तर त्याने सामने जिंकून दिले आहेत. अगणित वेळा आणि तेही अनेकदा जिथे त्याची टीम हरणार होती. 💪

टी२० मध्ये त्याची आकडेवारी? ती तर दणक्यातच आहे. 😎 तब्बल १३५००+ धावा, ३००+ विकेट्स, सामने जिंकून देणारी त्याची कामगिरी आणि त्याचा वारसा जो आपल्याला स्वप्नातच समजू शकेल. पण आकडेवारीपेक्षाही त्याचे मैदानावरील अस्तित्व महत्त्वाचे आहे. मैदानावर असो किंवा एमआयसोबत प्रशिक्षक म्हणून काम करणे असो, पोलार्ड हे संपूर्ण पॅकेज आहे. 💙

आता खरे सांगायचे तर, त्याचे मुंबई इंडियन्ससोबतचे नाते स्वप्नातीत आहे. पॉली एमआयचा पाठीचा कणा आहे आणि असेल. अत्यंत कठीण परिस्थितीतही तो सामना जिंकून देऊ शकतो- तो शांत, संयमी आणि आवश्यक तिथे उत्तम कामगिरी करायला सज्ज असतो.

त्याची मैदानावर टिकून राहण्याची क्षमता + नेतृत्व– टी२० मध्ये महान खेळाडू होण्यासाठी आवश्यक असलेले गुण पोलार्डकडे आहेत. प्रतिस्पर्धी बदलतील, जर्सी नवीन येतील पण लॉर्ड पॉली आहे तसाच आहे! 🌟

कायरन पोलार्ड, तुला आमचा सलाम! तब्बल ७०० सामने खेळूनही प्रत्येक सामना पहिलाच असल्यासारखे तू खेळतोस. पुढील काळात असे अनेक सामने, युक्तीबद्ध मास्टरप्लॅन्स आणणि आठवणी तुला ब्लू अँड गोल्डमध्ये मिळोत. 🤝