MI Charcha | एमआय युनिव्हर्ससाठी खेळण्याबाबत आणि विश्वासाचे महत्त्व सांगताना कॉर्बिन बॉश

आता २ मे २०२६ रोजी मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सचा सामना एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर करणार असल्यामुळे सर्वांच्या नजरा तिकडे लागलेल्या आहेत. शहर वेगळे असले तरी सामन्याची तीव्रता तेवढीच आहे आणि आपल्यासाठी दोन गुण खूप महत्त्वाचे आहेत. पलटन, चला एकत्र येऊया, आपल्या पोरांवर विश्वास ठेवूया आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांना पाठिंबा देऊया. सामन्यापूर्वी अष्टपैलू कॉर्बिन बॉशने आपल्या संयमी आणि शांत स्वभावाची झलक एमआय चर्चावर दिली आणि कधीही हार न मानण्याच्या एमआयच्या दृष्टीकोनाबाबत तो बोलला. 💙

आयपीएलमध्ये त्याच्या एमआयसोबतच्या सहयोगाबाबत आणि त्यानंतर एसए २० आणि एमएलसीमध्ये एमआय केपटाऊन आणि एमआय न्यूयॉर्कसोबत खेळण्याबाबत बोलताना कॉर्बिन म्हणाला, “एमआयसोबत खेळणे ही एक खास गोष्ट आहे. पडद्यामागे काय काय घडते हे लोकांना फारसे माहीत नसते. प्रत्येक गोष्टीवर नीट लक्ष दिले जाते आणि खेळाडूंना फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे असते. सर्व प्रशिक्षक आणि अनेक खेळाडूंशी ओळख असल्यामुळे एमआयसोबत सामने खेळताना गोष्टी सोप्या होतात. त्या सर्वांसोबत खेळताना मला मजा येतेय. एका टीममधून दुसऱ्या टीममध्ये जातानाचा हा प्रवास खूपच सुकर झाला आहे.”

त्याने खेळाच्या सर्वांत छोट्या स्वरूपात आपल्या चार ओव्हर्सच्या कामगिरीत तो कशा प्रकारे पुढाकार घेतो याबाबत मते व्यक्त केली. तसेच कधीकधी तणावाखाली असताना सामना कुठल्या दिशेला गेला पाहिजे याचा निर्णय कसा होतो हेही त्याने सांगितले. “आतापर्यंत आयपीएलमध्ये गोलंदाजी खूप अटीतटीची झाली आहे आणि चुका करायला फारशी संधी नाही. आम्हाला खूप स्पष्टपणे खेळावे लागते आणि आमच्या तयारीवर विश्वास ठेवावा लागतो. प्रत्येक गोष्ट तयारीशी संबंधित असते. प्रत्येक गोष्टीची तयारी करायची आणि मैदानावर पार पाडायची. सुस्पष्टता, सामन्याची योजना आणि आम्ही प्रत्येक फलंदाजासाठी एक योजना तयार करतो. हा गोलंदाजीच्या प्रक्रियेचाही भाग आहे. लवचिक राहणे खूप महत्त्वाचे आहे.”

अंतिमतः कॉर्बिनने मुंबई इंडियन्सच्या महान खेळाडूंकडून मिळालेला एक महत्त्वाचा सल्ला सर्वांना दिला. “तुमच्या तयारीवर विश्वास ठेवा आणि शांतपणे संयमाने खेळा. आम्ही मैदानात खूप मेहनत करतो. प्रशिक्षणादरम्यान आमचा दृष्टीकोन आणि सामना खेळण्याबाबत आमचा सकारात्मक विचार या गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठा शब्द आहे,” तो म्हणाला. 🙏

स्थिर, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि एक मेहनती खेळाडू असलेला आपला कॉर्बिन बॉश संधी मिळाल्यावर तिचे सोने करण्यासाठी तयार आहे. ✊