सादर आहेत अमेरिकेचे चॅम्पियन्स – एमआय न्यूयॉर्क!!!

चॅम्पियन्स, चॅम्पियन्स ओले ओले ओले!!! 🎶🏆

अगदी अडखळती सुरूवात ते ट्रॉफी उचलण्यापर्यंत - एमआय न्यूयॉर्कने आपले नाव राखले आहे! 💙 मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या वर्षाच्या चॅम्पियन्सनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांनी तीन वर्षांतला दुसरा चषक जिंकला असून #OneFamily मध्ये कमबॅक्स वारंवार होतात हे स्पष्ट केले आहे.

या वर्षी तीन खंडांमध्ये पाच लीग्समध्ये एमआयच्या टीम्सनी पाचही ठिकाणी प्लेऑफ्समध्ये धडक दिली आहे. जागतिक दबदबा यालाच म्हणतात 🔥

डल्लासमध्ये झालेल्या वॉशिंग्टन फ्रीडमविरूद्धच्या अंतिम सामन्यात चांगलीच धमाल झाली. मिनीच्या सलामी फलंदाजांकडून धमाकेदार सुरूवात, तब्बल १८० अशी मोठी धावसंख्या आणि गोलंदाजांनी तिचा बचाव करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. कारण हल्लीच्या काळात कितीही मोठी धावसंख्या असली तरी ती सुरक्षित असत नाही आणि अंतिमतः पाच धावांनी विजय मिळवल्यानंतर सोडलेला सुटकेचा निःश्वास सर्वांनीच ऐकला. 😌

ही मोहीम आतषबाजीने नक्कीच सुरू झाली नाही. परंतु आपल्या पोरांनी काम सुरूच ठेवले. त्यांनी प्रक्रियेवर विश्वास ठेवला आणि मुंबई इंडियन्सचा लढा कायम ठेवला. 💪

या पोलार्ड बोल्डी जोडीसाठी एक खास उल्लेख करावा लागेल. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व ठेवले.

पॉलीने (३१७ धावा आणि सहा विकेट्स) अलीकडेच आपल्या करियरमधले 700 T20s सामने पूर्ण केले. तो आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये होता. त्याने अत्यंत आवश्यकता असताना आपली उत्तम कामगिरी कायम ठेवली. तणावाखाली शांत राहणे, फलंदाजीत फटकेबाजी करणे आणि फील्डिंगमध्ये आघाडीवर राहणे- क्लासिक कायरन पोलार्ड स्टाइल! 😎

… आपल्या स्पीडस्टार ट्रेंट बोल्टबाबत तर काय बोलावे!!! या डावखुऱ्या जादुई गोलंदाजाने अत्यंत घातक गोलंदाजी आणि सामना पालटणारी कामगिरी करत स्वतःची जादू दाखवली. त्याने १२ इनिंग्समध्ये १५ विकेट्स घेतल्या. ⚡⚡

या वेळी आणखी एक आपला लाडका अतिशय सायलेंट खेळाडू होता. त्याने आपल्या टीमसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून नाव कमावले. आपल्या २२ वर्षीय रूषिल उगरकरने आठ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेऊन चषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

तर आता आपल्या कपाटात आणखी एक ट्रॉफी आलीय. आणखी काही अविस्मरणीय क्षण आणि हार न मानणारी आपली टीम. मिनी बेबी, तू लीगमध्ये टॉपला आहेस! 🤩