परतफेड? वेळापत्रकात बदल? #MIvDC सामन्याच्या तिकिटांशी संबंधित तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे!

पलटन, लवकरच टाटा आयपीएल २०२५ पुनरागमन करणार आहे!

दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या (यापूर्वी १५ मे रोजी होणारा सामना) आपल्या घरच्या खेळपट्टीवरच्या सामन्यासाठी तिकिटे घेतलेल्या चाहत्यांचे अनेक प्रश्न होते. बुक केलेल्या तिकिटांच्या वैधता किंवा परतफेडीबाबतची उत्तरे इथे आहेत.

घाबरु नका! 🫡 येत्या २१ मे रोजी डीसीविरूद्ध नव्याने खेळल्या जाणाऱ्या सामन्याबाबत तुमच्या प्रत्यक्ष आणि एम तिकिटांबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे आहेत.

**********

👉 सामन्याची बदललेली तारीख काय आहे?

#MIvDC हा सामना सुरूवातीला १५ मे २०२५ रोजी खेळवला जाणार होता. तो आता २१ मे २०२५ रोजी खेळवला जाईल.

👉 माझी १५ मेच्या सामन्यासाठीची तिकिटे २१ मेच्या सामन्यासाठी वैध आहेत का?

हो. १५ मे रोजीच्या सामन्यासाठी खरेदी केलेली तिकिटे २१ मे रोजी खेळवल्या जाणाऱ्या सामन्यासाठी वैध आहेत. त्यासाठी वेगळे काहीही करण्याची गरज नाही.

👉 मला नवीन तारखेला उपस्थित राहता आले नाही तर काय होईल? मला रिफंड मिळेल का?

हो. तुम्ही खालील २४ तासांच्या कालावधीत रिफंडसाठी विनंती करू शकता:

सुरूवात: १४ मे, दुपारी १२:०० वाजता| अंतिम तारीख: १५ मे, दुपारी १२:०० वाजता.

या कालावधीत तुम्ही रिफंडची विनंती करू शकता किंवा तुम्हाला तिकीट कायम ठेवायचे आहे याची खात्री करू शकता.

तुम्हाला या कालावधीत तपशिलवार सूचनांसह एसएमएस मिळेल.

महत्त्वाचे: रिफंड संपूर्ण व्यवहाराला लागू होतील (एकत्र खरेदी केलेल्या तिकिटांवर) आणि सर्व रिफंड बुकमायशोवरून दिले जातील.

👉 तुम्ही २४ तासांच्या कालावधीत उत्तर न दिल्यास काय होईल?

तिकिटधारकाने १५ मे रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत उत्तर न दिल्यास व्यक्तीला तिकीट ठेवायचे आहे असे गृहित धरले जाईल आणि बुकिंग २१ मे रोजी पुढे नेले जाईल.

👉 माझे एम तिकीट नवीन तारखेला अपडेट केले जाईल का?

हो. तुमचे एम तिकीट नवीन तारखेसह अद्ययावत केले जाईल. तुम्हाला दुसरे काहीही करण्याची गरज नाही आणि अद्ययावत तारीख तुमच्या तिकिटावर दर्शवली जाईल.

👉 माझ्याकडे १५ मे अशी तारीख प्रिंट केलेले प्रत्यक्ष तिकीट आहे. ते वैध आहे का?

हो, १५ मे तारीख प्रिंट केलेली प्रत्यक्ष तिकिटे २१ मेच्या सामन्यासाठी वैध असेल. तुम्हाला पुन्हा प्रिंट करण्याची किंवा बदलण्याची गरज नाही.

रिफंडचा पर्याय कॉर्पोरेट / प्रत्यक्ष तिकिटे घेणाऱ्यांनाही उपलब्ध असेल.

👉 अधिक माहितीसाठी मी कोणाशी संपर्क साधू शकेन?

अधिक माहितीसाठी कृपया support.bookmyshow.com वर कस्टमर केअरशी संपर्क साधा.

वानखेडेवर भेटूया, पलटन!