MIvDC रिपोर्ट: सुप-हरमन मेजवानी आणि मग शेवटच्या चेंडूवरचा षटकार! २०२४, एमआय आलीरे!
डब्ल्यूपीएलमध्ये पाठलाग करताना १०० टक्के रेकॉर्ड राखला गेलाय आणि कसे ते पाहा. शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. हरमनप्रीत कौरने अत्यंत अटीतटीने लढा देऊन मुंबई इंडियन्सला शेवटच्या टप्प्यावर आणले आणि बाद झाली. मग आली संजना संजीवन. पहिलाच सामना. एलिस कॅप्सीने टॉस टाकला आणि धुडूम! तिने लाँग ऑनवर टॉक्क! करून चेंडू फटकावला तो स्विंग होऊन सीमापार गेला.
मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएल २०२४ चा पहिला सामना जिंकला आणि खरं सांगतोय, काय रोमांचक सामना होता!
सुप-हरमनची मेजवानी!
मुंबई इंडियन्सने २०२३ च्या आपल्या कॅम्पेनला ज्या प्रकारे सुरूवात केली तशीच सुरूवात याही वेळी झाली. हरमनप्रीत कौरने चेंडू घुमव घुमव घुमवला. आजसुद्धा (२३ फेब्रुवारी) तेच घडले. ती सातव्या ओव्हरमध्ये ५०/२ वर संघ असताना मैदानात आली. थोडा काळजीचा विषय होताच. मग पळत जाऊन एक धाव घेताना तिच्या पायाला दुखापतही झाली. पण इतिहास गवाह है की जखमी हरमन आणि जखमी वाघीण जास्त घातक असते. झालेही तसेच. तिने फटकेबाजी केली. जोरदार फटकेबाजी केली. ३४ चेंडूंमध्ये ५५ धावा कुटल्या. १९ व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर आवश्यक असलेला षटकार टोलवला आणि मग १९.४ ओव्हर्समध्ये चौकार फटकावला. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.
यस्त्रिका, अमेलियाचा धडाका
यस्त्रिका भाटियाने आपल्या २०२३ च्या कामगिरीनुसारच आपल्या टीमला चांगली सुरूवात करून देण्यासाठी सगळे प्रयत्न केले. सुरूवातीलाच विकेट पडल्यानंतर तिने सावधगिरी आणि आक्रमकता यांचा मेळ घातला आणि मग हरमनला तिचा टच गवसत नव्हता तेव्हा तिने प्रेरकाची भूमिका निभावली. ५७ धावा| ४५ चेंडू | ८ चौकार | २ षटकार.
अमेलिया केरने मागील महिन्यात विमेन्स सुपर स्मॅशमध्ये जिथे गोष्टी सोडल्या होत्या तिथूनच सुरूवात केली. आपला वेलिंग्टनचा फॉर्म मुंबईसाठी आणताना तिला काहीही प्रयत्न करावे लागले नाहीत. तिने रिव्हर्स मारले, पुल केला, हूक केला आणि १८ चेंडूंमध्ये २४ धावा करून हरमनच्या आक्रमकतेला पूरक खेळ केला.
मग अर्थातच संजना फिनिश!
डोक्यावर बर्फ. अत्यंत संयम. पहिलाच सामना. ५ धावा. १ चेंडू. तोही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूविरूद्ध. संजनाने यातली कोणतीही गोष्ट आपल्या मनाला लावूनच घेतली नाही. हा तिच्या डब्ल्यूपीएल करियरमधला पहिलाच चेंडू होता म्हणून काय झाले ? ती पिचवर पुढे मागे झाली, चेंडूला तिने अवकाशात पाठवले आणि मग एक डरकाळी फोडली! वाघीण आली होती ना!
शबनम इस्माइलसाठी एक स्माइल
ब्लू अंड गोल्डमध्ये पहिला सामना खेळून तिने प्रेक्षकांना पैसा वसूल करून दिला. तिने मेग लॅनिंगला आणि शफाली वर्माला फक्त एक धाव देऊन अत्यंत अचूक ओव्हर टाकली. मग पुढच्या ओव्हरमध्ये तिने अत्यंत घातक गोलंदाजी केली. मग काय, मिडल स्टंप उडून पडला ना, दादा! तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला असला तरी तिच्या वेगाने नाही. प्रतिस्पर्धी संघाच्या पाठीत थंडगार शिरशिरी आली असेलच.
थोडक्यात धावसंख्या: दिल्ली कॅपिटल्स: १७१/५ (२० ओव्हर्स) (एलिस कॅप्सी ७५; जेमिमा रॉड्रिग्स ४२; नॅट स्किव्हर- ब्रंट २/३३) चा मुंबई इंडियन्सकडून ४ विकेट्सनी पराभव: १७३/६ (२० ओव्हर्स) (यास्त्रिका भाटिया ५७, हरमनप्रीत कौर ५५; एलिस कॅप्सी २/२७)