घोषणा: मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२६ साठी राखलेले खेळाडू
मुंबई इंडियन्सने आपल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली असून सातत्यपूर्णता आणि दीर्घकालीन सर्वोत्तमतेप्रति आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे. त्यांनी वन फॅमिलीचे केंद्रस्थान कायम ठेवल्याचे स्पष्ट केले आहे.
तुमचे लाडके स्टार्स कुठेही जात नाही आहेत!
एमआयच्या यशाचा पाया कायम राहिला आहे. हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा ब्लू अँड गोल्डमधला आपला वारसा कायम ठेवतील कारण काही भागीदारी टिकून राहण्यासाठीच असतात.
पलटनला खुर्चीवर खिळवून ठेवणारा जलदगती हल्ला
ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर नेतृत्व करणार असल्यामुळे एमआयचे गोलंदाज कायम राहणार आहेत. ते वेगवान, घातक आणि निर्भय आहेत.
जागतिक दर्जाचे खेळाडू कायम
रायन रिकल्टन, विल जॅक्स, मिशेल संतनर आणि कॉर्बिन बॉश यांनी आपण ब्लू अँड गोल्डचेच आहोत हे सिद्ध केले आहे. मागच्या सीझनमध्ये सर्वांत जास्त गरज होती तेव्हा ते मैदानात आले आणि आता ते पुन्हा पुन्हा हे सिद्ध करण्यासाठी तयार आहेत. एएम गझनफर एमआयसोबत आपला पहिला सीझन खेळण्यासाठी तयार आहे (दुखापतग्रस्त झाल्यामुळे २०२५ च्या सीझनमध्ये तो खेळू शकला नाही.)
भविष्यातील गेम चेंजर्स
एमआयची तरूण ब्रिगेड फक्त भविष्य नाही तर ती वर्तमानही आहे. नमन धीर, अश्वनी कुमार, राज अंगद बावा, रघू शर्मा आणि रॉबिन मिन्झ हे तरूण तुर्क पुन्हा एकदा वानखेडेवर चमकणार आहेत आणि आयपीएलला चार चांद लावणार आहेत.
विजयी ट्रेड
शार्दुल ठाकूर, शेरफाने रूदरफोर्ड आणि मयंक मार्कंडे संघात सामील झालेत. या सर्वांनी स्वतःला सिद्ध केले असून ते या अद्वितीय संघात अमूल्य योगदान देतील.
मुक्त केलेले आणि ट्रेड केलेले खेळाडू
धोरणात्मक बदल आणि संघातील संतुलन कायम ठेवण्यासाठी लिलावापूर्वी सात खेळाडूंना मुक्त करण्यात आलेः कर्ण शर्मा, बेवॉन जेकब्स, मुजीब उर रेहमान, विघ्नेश पुथूर, केएल श्रीजीत, पीएसएन राजू, रीस टोपली आणि लिझाद विल्यम्स आणि अर्जुन तेंडुलकरला ट्रेड करण्यात आले.
मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने सर्व खेळाडूंप्रति कृतज्ञता दर्शवली असून त्यांची वचनबद्धता तसेच ब्लू अँड गोल्डदरम्यान त्यांनी केलेल्या कामाचा गौरव केला आहे. ते व्यावसायिक क्रिकेटच्या पुढच्या टप्प्यात जात असताना त्यांना यश मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.
राखलेले खेळाडू:
➡️ एएम गझनफर
➡️ अश्वनी कुमार
➡️ कॉर्बिन बॉश
➡️ दीपक चहर
➡️ हार्दिक पांड्या
➡️ जसप्रीत बुमराह
➡️ मयंक मार्कंडे (ट्रेड इन)
➡️ मिशेल संतनर
➡️ नमन धीर
➡️ रघू शर्मा
➡️ राज अंगद बावा
➡️ रॉबिन मिन्झ
➡️ रोहित शर्मा
➡️ रायन रिकेल्टन
➡️ शार्दुल ठाकूर (ट्रेड इन)
➡️ शेरफाने रूदरफोर्ड (ट्रेड इन)
➡️ सूर्यकुमार यादव
➡️ तिलक वर्मा
➡️ ट्रेंट बोल्ट
➡️ विल जॅक्स
मुक्त केलेले खेळाडू:
➡️ बेवॉन जेकब्स
➡️ कर्ण शर्मा
➡️ केएल श्रीजीत
➡️ लिझाद विल्यम्स
➡️ मुजीब उर रेहमान
➡️ पीएसएन राजू
➡️ रीस टोपली
➡️ विघ्नेश पुथूर
ट्रेड आऊट:
➡️ अर्जुन तेंडुलकर