“माझा फोकस पहिल्या सामन्यावर आहे. हा सामना तंबूतल्या उंटासारखा आहे”: जयवर्धने

महेलासोबत चर्चा- वन फॅमिली स्टाइल

एमआय पलटनसाठी आजचा दिवस खास होता. त्यांनी बिहाइंड दि सीन्स मास्टरमाइंड आपले प्रमुख मार्गदर्शक महेला जयवर्धने यांच्यासोबत चर्चा केली आणि बरेच काही शिकून घेतले. त्याने चाहत्यांसोबत अत्यंत मनमोकळेपणाने चर्चा केली. 🫡 मुंबई इंडियन्समध्ये फक्त क्रिकेटचा विषय नसतो तर आपल्या सर्वांना एकत्र आणणारा संवाद त्यातून घडतो. 💙

पलटनप्रमाणेच महेला यांनीही आयपीएलची सुरूवात सामना जिंकून करण्यावर भर दिला. घरच्या खेळपट्टीवर वानखेडेवर लोक कशा प्रकारे एकत्र येतात आणि मेन इन ब्लूना पाठिंबा देतात याबाबत कौतुक केले. 👊 “वानखेडेवरचे चाहते कधीही निराश करत नाहीत. टीमसोबत आठ वर्षे खेळलो आणि सहा वर्षे मी मुख्य प्रशिक्षक होतो. आमच्यासाठी पहिला सामना तंबूतल्या उंटासारखा आहे. हा सामना कसा जिंकायचा? मी खऱ्या अर्थाने पहिला सामना जिंकण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. हा विजय मिळवल्यानंतर अत्यंत जोरदार सुरूवात होईल. मला शक्य असल्यास सगळ्या गोष्टी जरा वेगळ्या पद्धतीने करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स वापरून पाहता येतील,” असे तो म्हणाला.

माहिती आणि सामन्यांबाबत विचारण्यात आल्यावर जयवर्धने म्हणाले की, डेटा अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत असला तरी मी त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत नाही. त्यांच्या मते टीमच्या धोरणाबाबत मनातून येणारे संकेत आणि या संकेतांना आधार देण्यासाठी डेटाचा वापर उपयुक्त ठरतो.

क्रिकेटबरोबरच मुंबई शहराबाबतचे आपले प्रेमही महेला यांनी व्यक्त केले. “मला दररोज मुंबईचे एक वेगळे रूप दिसते आणि ते मला रोमांचित करते. कधीकधी वाहतूक कोंडीत अडकलेले असताना फेरीवाले कशा प्रकारे सामान विकतात आणि लोक गाड्या कशा प्रकारे चालवतात ते मी पाहतो. याचा मला कधीही कंटाळा येत नाही. मी अनेकदा रात्री उशिरा प्रवास करतो आणि पहाटे तीन वाजता दिवस असल्यासारखी गर्दी असते. कोणीही झोपलेले नसते. मला हे जगात कुठेही दिसलेले नाही.” ❤️

आपले ब्लू अँड गोल्डमधले बॉइज नवीन ऊर्जा आणि सहाव्या चषकावर लक्ष ठेवून स्पर्धेत उतरायला तयार आहेत. काऊंटडाऊन सुरू झालं आहे. चला तर मग... 🏆🏆🏆🏆🏆