Nat चा Birthday!! आपल्या खास MI स्टारचा वाढदिवस साजरा करूया

मैदानावरची चॅम्पियन, तिच्या खेळात नेहमीच दिसतो क्लास,

प्रत्येक धाव, विकेट आणि विक्रमासह नॅट सायव्हर-ब्रंटने निर्माण केली स्वतःची खास ओळख.

प्रत्येक आव्हानात, प्रत्येक परीक्षेत,

तिने दाखवून दिलंय, ती सर्वोत्तम का आहे खेळात.

मनाने नेहमीच विजेती, सुपरस्टारची तिच्यात चमक खास,

सुरुवातीपासूनच NSB ने उजळून टाकलं मुंबई इंडियन्सचं विश्व खास.

प्रिय नॅट, तुला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा,

येणारं वर्ष घेऊन येवो आनंद, यश आणि असंख्य सुखद आठवणींचा ठेवा.

अशीच चमकत राहा, यशाची नवी उंची गाठत राहा,

पलटनसाठी तू किती खास आहेस, हे नेहमी लक्षात ठेवा.

मोठे क्षण नेहमीच चॅम्पियन्समधील सर्वोत्तम खेळ बाहेर आणतात. पण आपल्या नॅट सायव्हर-ब्रंटच्या बाबतीत अशा क्षणांमध्ये काहीतरी आणखी खास पाहायला मिळते - मैदानावरचा तिचा कमालीचा शांतपणा. दमदार फटके असोत किंवा मोलाच्या विकेट्स, दबावाचे प्रसंग असोत किंवा ब्लू अँड गोल्डमधील जल्लोषाचे क्षण... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई इंडियन्ससाठी मैदानात उतरताना प्रत्येक वेळी दिसणारी तिची कधीही हार न मानण्याची वृत्ती. आज पलटन आपल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एकीचा वाढदिवस साजरा करत आहे. संपूर्ण MI परिवाराकडून नॅटला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

नॅटमध्ये आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मूल्ये दिसून येतात - विश्वास, जिद्द, एकजूट आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची वृत्ती. सहकाऱ्यांसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्यापासून ते पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यापर्यंत तिचा प्रभाव सर्वदूर दिसून येतो. स्वतःच्या कामगिरीतून आदर्श निर्माण करत ती प्रत्येक वेळी आपली छाप पाडण्याचा मार्ग शोधते. अगदी सुरुवातीपासून MI संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या नॅटने आपल्याला असंख्य अविस्मरणीय क्षण दिले आहेत, विशेषतः दोन WPL विजेतेपदांच्या रूपाने.

सामने जिंकून देणाऱ्या कामगिरींपलीकडेही नॅट नेहमीच साधी आणि मनमिळाऊ राहिली आहे. आपल्या सहकाऱ्यांना ती नेहमीच महत्त्व देते. तिचा नम्र स्वभाव, प्रेमळपणा आणि चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य प्रत्येकाला आपलंसं करतं. MI साठी म्हणूनच आपली नॅट खऱ्या अर्थाने खास आहे—केवळ मैदानावरील प्रकाशझोतात दिसणारी सुपरस्टार म्हणून नाही, तर त्यामागे असलेली एक अतिशय सुंदर व्यक्ती म्हणूनही.