नवीन वर्ष, नवी सुरूवात! न्यूझीलंडविरूद्ध भारताच्या ओडीआय संघाची घोषणा
क्रिकेटच्या सर्व चाहत्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🥳
नवीन वर्षात क्रिकेटचे नवीन प्रेम ओसंडून वाहू लागले आहे.
भारताच्या नववर्षातील पहिल्या मालिकेइतके चांगले काय असू शकते? भारतीय संघ ३ सामन्यांच्या रोमांचक ओडीआय मालिकेसाठी न्यूझीलंडचा सामना करणार आहे. 🔥
ओडीआय म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट- हिटमॅनची एक्शन! 💥
निळी जर्सी, पांढरा चेंडू आणि रोहित शर्माची फटकेबाजी. अजून काय हवं!
चाहते तर केव्हापासूनच तयार आहेत. त्यांनी कॅलेंडर्स मार्क करून ठेवली आहेत आणि काऊंटडाऊन सुरू झालंय.
कारण ११ जानेवारी ही फक्त नेहमीची एक तारीख नाही तर त्या दिवशी एक्शन सुरू होतेय आणि उत्साह शिगेला पोहोचलेला असेल. 😍
आता जराही विलंब न लावता न्यूझीलंडविरूदध भारताचा ओडीआय संघ पाहूया 👇
न्यूझीलंडविरूद्ध भारताचा ओडीआय संघ
भारतीय ओडीआय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (उपकर्णधार)*, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मो. सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (विकेट कीपर), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल
नोंद: *श्रेयस अय्यर खेळण्यास सुदृढ असल्यासच खेळेल.