२०२० मध्ये #OnThisDay: मुंबई इंडियन्सचा पाचवा आयपीएल चषक नावावर
१० नोव्हेंबर २०२० - या दिवशी मायानगरी मुंबई पुन्हा एकदा गोल्ड अँड ब्लूमध्ये रंगली होती. याच दिवशी आपण पाचवा आयपीएल चषक जिंकला आणि लीगचे निर्विवाद चॅम्पियन्स म्हणून स्थान पटकावले.
याच दिवशी प्रत्येक मुंबईकराच्या काळजाचा ठाव घेतला गेला कारण हा विजय खूपच खास होता.
संपूर्ण स्पर्धेदरम्यान मुंबई इंडियन्सने तूफानी कामगिरी केली. लीग टप्प्यात १४ सामन्यांपैकी नऊ विजय मिळवले. आपण शांतपणे, संयमाने खेळलो आणि वर्चस्व गाजवले. आपण फक्त क्रिकेट खेळलो नाही तर सत्ता गाजवली. 🙌
आपले वर्चस्व प्लेऑफ्समध्ये दिसून आले- आपण क्वालिफायर १ मध्ये दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि त्यानंतर ग्रँड फिनालेमध्ये याच संघाविरूद्ध पाच विकेट्सनी विजय मिळवून ट्रॉफी घरी आणली... परत एकदा. 🏆
प्रत्येक खेळाडूने उत्तम खेळ केला. टॅलेंट, विश्वास आणि टीमवर्कचे हे एक उत्तम उदाहरण होते. पण या सामन्याचा स्पॉटलाइट कोण असेल तर तो सूर्यादादा होता. त्याचा खेळ देखणा होता. त्याने १५ इनिंग्समध्ये ४०.०० च्या सरासरीने ४८० धावा केल्या आणि मधली फळी टिकवून ठेवली.
… आणि आपला जस्सी- बोल्टी कॉम्बो? तो तर खतरनाकच होता. प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्यांनी जराही सुट्टी दिली नाही. या दोघांनी मिळून तब्बल ५२ विकेट्स घेतल्या, आहात कुठे?
थोडक्यात सांगायचे तर अनेक आठवणी आहेत पण एक स्टेटमेंट स्पष्ट आहे: आम्ही खेळतो तेव्हा इतिहास रचतो. ✨