२०१८ मध्ये #OnThisDay: हार्दिक, बुमराह यांच्या खास कामगिरीमुळे भारताचा ट्रेंट ब्रिजवर विजय

२०१८. ट्रेंट ब्रिज. १८-२२ ऑगस्ट. या कसोटी सामन्यात काय नव्हते ते विचारा. 👉 विराटचे सुंदर शतक, पांड्याची अष्टपैलू कामगिरी आणि बुमराहच्या पाच विकेट्स.

या कामगिरीने ट्रेंट ब्रिजला ब्लू रंगात रंगवले. 💙

🎥 २०१८ मध्ये परत जाऊन या विजयाची उजळणी करूया.

🔥 हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी

इंग्लंडचा संघ ८६/३ वर असताना आपला पॉवर पांड्या चेंडू घेऊन खेळायला आला आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने पहिल्याच चेंडूवर जो रूटला बाद केले आणि मग अक्षरशः धूळधाण झाली.

पांड्याने शेवटच्या सातपैकी पाच विकेट्स घेऊन मधल्या आणि खालच्या फळीचा सुपडा साफ केला. एचपीच्या सहा ओव्हरमध्ये ५/२८ मुळे इंग्लंडचा संघ फक्त ३८.२ ओव्हर्समध्ये १६१ धावांवर गुंडाळला गेला.

परंतु पांड्या तिथेच थांबला नाही. भारतीय संघ दुसऱ्या इनिंगमध्ये वर्चस्व गाजवत असताना तो २८२/५ वर खेळायला आला आणि फक्त ४२ चेंडूंमध्ये नाबाद ५२* अक्षरशः फटकावल्या. तो अतिशय निडरपणे प्रतिस्पर्धी संघाला भिडला आणि त्यामुळे भारतीय संघ ३५२/७ पर्यंत गेला आणि इंग्लंडसमोर तब्बल ५२० धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले.

💥 जसप्रीत बुमराहने गेले गुमराह

स्टेज नॉकआऊट कामगिरीसाठी सज्ज असताना बुमराहने ही कामगिरी अगदी स्टाइलमध्ये पार पाडली. त्याचा अप्रतिम वेग आणि घातक अचूकतेपुढे इंग्लंडचा पाठलाग कमकुवत पडला. ते ५/८५ वर आले.

बुमराहचे गुमराह झालेले बळी: रूट ❌ बटलर❌ बेरस्टो❌ वोक्स❌ ब्रॉड❌

ट्रेंट ब्रिजवर २०३ धावांचा विजय म्हणजे एक तडाखेबाज कामगिरी होती. या सामन्याने प्रत्येक चाहत्याला अभिमानाचा क्षण दिला आणि आपल्या सर्वांत आवडत्या परदेशी विजयांपैकी एक ठरला. 💙