२०२० मध्ये #OnThisDay: प्रत्येक एडलेडसाठी एक मेलबर्न आहे
कल्पना करा 👉 एक परदेशी कसोटी मालिका. एक काळजाला चरे पाडणारा पराभव. थोडक्यात सांगायचे तर आपण परतण्याची
काहीही शक्यता नसल्याचे संपूर्ण जगाचे मत झाले होते.
आणि त्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे पुढचा कसोटी सामना जिंकता. अशक्य वाटतंय ना? खरं सांगा?
पण सामना असाच पार पडला... 💥
पाच वर्षांपूर्वी #OnThisDay भारतीय क्रिकेटने सर्वाधिक सुंदर कमबॅग स्टोरीजपैकी एकीचा अनुभव घेतला आणि प्रत्येक सामना तुम्हाला वेगळे काहीतरी देऊन जातो हेही शिकले.
या मालिकेची सुरूवात पराभवाने झाली. पहिल्या कसोटीत टीमच्या कसोटी इतिहासातील सर्वांत कमी धावसंख्या नोंदवून भारतीय संघ फक्त ३६ वर बाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाने १-० ची आघाडी घेतली आणि आता काय घडणार याचे भाकीत अनेकांनी वर्तवले होते. त्यांच्या मते मालिका हातातून गेली होती. व्हाइटवॉश नक्की होणार असे वाटत होते.
ख्यातनाम बॉक्सिंग डे कसोटीसाठी आपला संघ मेलबर्नला रवाना झाला. तेव्हा चर्चेला उधाण आले. शंका.
अंदाज वर्तवण्यात आले. आणि कोणालाही विश्वास नव्हता (निदान वरवर तरी तसे दिसत होते.)
पण ड्रेसिंग रूममधले वातावरण वेगळेच होते.
भारतीय संघ मैदानात आला तेव्हा दोन नवीन खेळाडू खेळणार होते- शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज. अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करत होता. आधीच्या कसोटीचा कर्णधार नव्हता. काहीही कारणे नाहीत.
फक्त प्रयत्न होते.
मग खेळ सुरू झाला. प्रत्येक बाबतीत ही कर्णधाराची सर्वोत्तम खेळी होती. त्याने पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या ११२ धावा अत्यंत नियंत्रित, शांत संयमी होत्या. तो टीकाकारांना उत्तर देण्यासाठी मैदानात उतरला असावा असे वाटत होते.
त्याला रवींद्र जडेजाकडून उत्तम सपोर्ट मिळाला. त्याने दिलेल्या योगदानामुळे आपल्याला १२१ धावांची भागीदारी करता आली. सामना हळूहळू पालटत गेला.
आणि गोलंदाजीत आपल्या लाडक्या बूम बूमने चांगलीच धमाल केली. जसप्रीत बुमराहने ४/५६ आणि २/५४ या आकडेवारीची कामगीर करून ऑस्ट्रेलियन संघाला मैदानात स्थिरावू दिले नाही.
भारताने अवघ्या चारच दिवसांत ऑस्ट्रेलियाला आठ विकेट्सनी पराभूत केले आणि मालिका १-१ ने बरोबरीत आणली. त्यांनी स्पर्धा पूर्णपणे आपल्या नावावर केली. सर्व बाद ३६ धावांवरून पूर्णपणे वर्चस्वापर्यंत. पराभवापासून ऐतिहासिक विजयापर्यंत.
आजही मेलबर्नमधील कसोटी सामना अविस्मरणीय आहे. फक्त विजय म्हणू नाही तर एक दृष्टीकोन म्हणूनही.
कारण आयुष्य आणि क्रिकेट आपल्याला एक गोष्ट कायम शिकवतात: कमबॅक > सेटबॅक्स. ✨