“बुमराहकडून एक महत्त्वाची गोष्ट शिकली पाहिजे. ती म्हणजे त्याची कामातील नीतीमत्ता”: पारस म्हाम्ब्रे
पलटन, आता तयारी करून, पुन्हा लक्ष केंद्रित करून आपल्या पुढील सामन्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे. त्यात मुंबई इंडियन्स बर्सापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे ७ एप्रिल २०२६ रोजी राजस्थान रॉयल्सचा सामना करणार आहेत. पुढील सामन्यापूर्वी आपल्यासाठी नियोजन करणारे आणि पुढील रणनीती आखणारे आपले गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे एमआय चर्चामध्ये सहभागी झाले होते. मास्टरक्लास सेगमेंटमध्ये चर्चा करताना त्यांनी पलटनला एमायच्या हल्ल्यामध्ये महत्त्वाचा भाग असलेली माहिती दिली आणि पुढील पिढीच्या ब्लू अँड गोल्डसोबत काम करण्याची योजना सांगितली. 💙
पारस यांनी जसप्रीत बुमराह आणि एका तरूण खेळाडूपासून जागतिक कीर्तीचा खेळाडू होण्यापर्यंत झालेल्या प्रवासाबाबत चर्चा केली. आजही त्याच्या खेळाची जादू कायम राहिल्याबद्दल त्यांनी सांगितले. “प्रत्येक व्यक्ती आणि गोलंदाजाने एक महत्त्वाची गोष्ट बूमकडून घेतली पाहिजे. ती म्हणजे त्याच्या कामातील नीतीमत्ता होय. तो ज्या प्रकारे नेट्समध्ये खेळतो, त्याने आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टींवर काम केले आहे आणि मैदानात वापरणार आहे त्याचा सराव करतो. परंतु, भारतीय टीमसोबत मागील काही वर्षांत तो एक अद्वितीय गोलंदाज म्हणून उदयास आला आहे आणि एक व्यक्ती म्हणूनही त्याचा उदय झाला आहे. ही फारच सुंदर गोष्ट आहे.”
पहिल्या दोन सामन्यांदरम्यान एमआयचा गोलंदाजीबाबतचा दृष्टीकोन आणि एक प्रशिक्षक म्हणून विविध परिस्थितीत तो कशा प्रकारे धोरण आखतो त्याबाबत आपली मते त्यांनी व्यक्त केली. पारस म्हणाले की, “गोलंदाजी टीम म्हणून आम्ही मधल्या फळीत विकेट्स कशा घ्यायच्या, आमच्या योजना कशा पार पाडायच्या, प्रतिस्पर्धी संघावर तणाव कसा ठेवायचा आणि प्रत्येकाच्या शक्तीचा वापर कशा प्रकारे करून घ्यायचा यावर विचार करतो.”
“दोन्ही खेळपट्ट्या वेगळ्या होत्या. आता तुम्हाला सांगायचे म्हणजे, मुंबईत आम्हाला लाल रंगाच्या मैदानात खेळायला मिळते. लाल मातीचे गुणधर्म वेगळे असतात. तुम्हाला त्यावर गवत असल्यामुळे बाऊन्स मिळतो आणि शॉट्स सुलभपणे खेळतात येतात. या खेळपट्टीवर स्क्वेअर कट्स आणि पुल शॉट्स छान खेळता येतात. दिल्लीतल्या काळ्या मातीत खेळायला जातो तेव्हा बाऊन्स मिळत नाही आणि वेगळ्या पद्धतीने खेळावे लागते.”
आपल्या टीममधील अश्वनी कुमार आणि मोहम्मद इझर अशा तरूण खेळाडूंबाबत बोलताना तसेच एमआयने प्रत्येक सीझनसोबत बदललेली गोलंदाजी धोरणे याबाबत बोलताना ते म्हणाले की, “विविध ठिकाणी जाऊन सामने पाहणारे आणि या तरूणांची कौशल्ये पाहणारे निवड समितीचे सदस्य खूप महत्त्वाची कामगिरी बजावतात. मी त्यांच्या बाजूने उभा राहतो आणि मी करियरच्या या टप्प्यात होतो तेव्हा मी कुठे होतो असा प्रश्न स्वतःला विचारतो. मी नवखा खेळाडू होतो तेव्हा इथे पाय रोवायचा प्रयत्न करत होतो, दबाव कसा हाताळत होतो, विशिष्ट टप्प्यावर अपयश कसे पचवत होतो. या सगळ्याने मला त्यांच्यासोबत संवादाची सुरूवात कशी करायची हे कळते. तसेच त्यांच्यासोबत खूप वेळ घालवल्याने ती व्यक्ती कशी आहे आणि त्याला कशा प्रकारचा संवाद साधायचा आहे हेही कळते.”
मलिंगा आणि त्यांच्यावर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून वेगवेगळी जबाबदारी पार पाडावी लागते का असा विचारल्यावर ते म्हणाले की, “असा काही विशेष फरक नाही. आम्हा दोघांनाही आमचे अंतिम ध्येय काय आहे हे माहीत आहे. आम्ही नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे आहोत. आम्ही एकमेकांवर विश्वास, समजूतदारपणा आणि आदर बाळगतो. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. आम्ही दोघेही आमच्या टीमच्या हितासाठी कार्यरत आहोत.”
प्रत्येक यॉर्कर, खेळातील बदल आणि योजनेसाठी पारस म्हाम्ब्रे हे एमआयच्या गोलंदाजी टीममागील एक सायलेंट फोर्स आहेत. 💪