एजंट जॅक्ससाठी ऑपरेशन हॅप्पी बर्थ डेला सुरूवात
तो ५.२५ कोटी रूपयांना एमआयच्या तंबूत आल्याच्या क्षणापासून रडार तर विस्कटून गेले आहेत. एक संयमी इंग्लिश अष्टपैलू खेळाडू आला आणि पलटनमध्ये उत्साहाची लहर पसरली. तो १३ सामन्यांमध्ये फक्त सेटल झाला नाही तर तो ब्लू अँड गोल्डसोबत असा रमला की जणू तो कायमच सोबत होता. 💙🔥
त्याच्या पहिल्या नेट्सपासून पहिल्या सामन्यापर्यंत त्याच्यात खूप बदल झाले. विल जॅक्स एजंट जॅक्स झाला आणि काही कळायच्या आतच तो प्रत्येक मुंबईकरांच्या गळ्यातला ताईत आणि आपला लाडका जॅक्सभाऊ झाला.
एमआयशन आयपीएल २०२५ यशस्वीरित्या पार पडले. त्याने २३३ धावा, सहा महत्त्वाच्या विकेट्स आणि लोकांचे काळीज चोरले. एजंट जॅक्स फक्त स्पर्धेत सहभागी झाला नाही तर त्याने एमआयच्या खास स्टाइलमध्ये नेमून दिलेली स्पर्धा पार पाडली.
एजंट जॅक्सला राष्ट्रीय कर्तव्यावर बोलावण्यात आले आहे आणि त्याची पुढची असाइनमेंट लहान नाही.
त्याची पुढची मोहीम: एशेस २०२५/२६
जॅक्सीला त्याची तोडफोड ऊर्जा कायम ठेवण्यासाठी, पलटन ज्या कारणामुळे त्याच्या प्रेमात पडली तोच निर्भयपणा पुढे नेण्यासाठी खूप शुभेच्छा. एजंट जॅक्स. 🔥🏏
२०२६ साठी त्याचे कॅलेंडर बंद झाले आहे. एजंट जॅक्सला आपण कायम राखले असून तो पुन्हा एकदा #PlayLikeMumbai साठी सज्ज झाला आहे. 🚀
तर आमच्या एजंटला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. त्याचा हा सीझन धावा, विकेट्स आणि अविस्मरणीय आठवणींनी परिपूर्ण होवो आणि त्याचे हे वर्ष बॅटच्या फटकेबाजीइतकेच धमाल जावो. 🥳
जॅक भावा, मज्जा कर. वानखेडेवर भेटूच २०२६ मध्ये. 👊💙