आमचा छोकरा आणचा सुपरस्टार, आमचा वर्ल्ड कप हिरो, आमचा टीव्ही
मागील काही वर्षांत मुंबई इंडियन्सच्या संस्कृतीबाबत मोठी चर्चा होऊ लागली आहे. तरूण खेळाडूंमधील गुंतवणूक, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या देशांना एक अनुभवसिद्ध खेळाडू पाठवणे... ब्लू अँड गोल्डमधला एक तरूण खेळाडू ते आता भारतासाठी सिद्ध झालेला खेळाडू असलेला तिलक वर्मा हा अनेक तरूणांचा आदर्श आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत तरूण खेळाडू त्याच्याकडे आशेने पाहतात. तो करू शकतो तर आम्हीही करू शकतो असे त्यांना वाटते. 💙
आपला लाडका टीव्ही आयपीएल २०२६ साठी एमआय कॅम्पमध्ये येत असताना ही त्याच्या आगमनाची वर्दी नसते तो घरी परतल्यासारखे वाटते. पलटनसोबतचे त्याचे खास नाते त्यालाही खास बनवते. 😁 त्याच्या कामगिरीची गूंज वानखेडेच्या कानाकोपऱ्यात गुंजते आहे. त्याचे सुंदर कव्हर ड्राइव्ह, दोन खेळाडूंमधल्या जागेतून चेंडू टोलवणे, मैदानावर शक्तिशाली शॉट्स आणणि टीमसाठी नेमून दिलेले काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर विजय साजरा करण्याची त्याची पद्धत हे सगळे वानखेडेवर प्रत्येकाने अनुभवलेले आहे. 😎
हा टॅलेंटेड खेळाडू एमआय कॅम्पची नस आणि हृदयाचा तुकडा आहे. त्याला ड्रेसिंग रूममधले वातावरण आणि ब्लू अँड गोल्ड गणवेशासोबत येणारा वारसा समजतो. तिलक आता आमच्या काळजाचा तुकडा आहे आणि त्याने ही जागा स्वतःच्या मेहनतीने कमावली आहे. 💪
दुखापतीतून बरे होऊन आल्यावर तो अत्यंत शांत आणि समजूतदार झाला आहे आणि त्याचा खेळ अधिक प्रभावी झाला आहे. त्याने आशिया कप २०२५ आणि आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपमध्ये उत्तम कामगिरी करून तणावपूर्ण परिस्थितीतही संयमाने खेळ केला आहे. विश्वचषकादरम्यान त्याने १५४.४७ च्या सरासरीने २०७ धावा, एचएस- नाबाद ४४ (१६) केल्या होत्या. 👊
मोठी कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेला हा खेळाडू पलटनच्या मुकुटातला हिरा आहे. मेहनतीने पैलू पाडलेला हा हिरा पुन्हा एकदा खेळायला सज्ज आहे. 🙌