रणजी ट्रॉफी २०२५: तिलक, नमन आणि एमआय गँग देशांतर्गत स्पर्धांवर सत्ता गाजवण्यासाठी सज्ज

रणजी ट्रॉफी २०२५ जवळ आलीय आणि १५ ऑक्टोबर रोजी सामने सुरू होणार आहेत.

भारताची प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धा सुरू होतेय आणि आपले ब्लू अँड गोल्डमधले खेळाडू आपापल्या टीम्समध्ये उत्तम योगदान देण्यासाठी सज्ज आहेत. ⚡

या वेळी स्पर्धेचे नेतृत्व तिलक वर्मा करणार असून तो हैदराबादचा कर्णधार असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या अप्रतिम कामगिरीनंतर तो वर्चस्व गाजवण्यासाठी तयार असून त्याचा खेळ या वेळी बहरेल.

दरम्यान केएल श्रीजीत कर्नाटकचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे आणि त्याची अप्रतिम फलंदाजी लक्षात घेता तो दणादण धावा काढेल यात शंका नाही. उत्तरेकडे आपले नमन धीर आणि रघू शर्मा रणजीच्या स्टेजवर आक्रमकता आणण्यासाठी सज्ज आहेत. या वेळी तुम्हाला तोडफोड आणि धमाल पाहायला मिळेल. 🔥

आपला लाडका कर्ण शर्मा पुन्हा एकदा रेल्वेसाठी खेळेल. तो फिरकीची जादू विणेल, भागीदारी मोडीत काढेल आणि आपल्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करेल. दीपक चहरला विसरून कसे चालेल. तो राजस्थानसाठी चहर का कहर दाखवण्यासाठी आणि पहिल्या फळीतल्या प्रतिस्पर्ध्यांना गारद करायला तयार आहे. 🎯

अर्जुन तेंडुलकर आणि राज अंगद बावादेखील गोवा आणि चंदीगढच्या संघांसाठी खेळतील. अर्जुनने मागच्या सीझनमध्ये चार सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या तर राजने सहा सामन्यांमध्ये ३७६ धावा आणि आठ विकेट्स घेतल्या.

ऑल दि बेस्ट भावांनो!

रणजी ट्रॉफी २०२५ मध्ये एमआयचा संघ

खेळाडू

टीम

तिलक वर्मा (कर्णधार)

हैदराबाद

नमन धीर (कर्णधार)

पंजाब

दीपक चहर

राजस्थान

अर्जुन तेंडुलकर

गोवा

केएल श्रीजीत

कर्नाटक

कर्ण शर्मा

रेल्वे

राज अंगद बावा

चंदीगड

रघू शर्मा

पंजाब