RCBvMI पूर्वावलोकन: चिन्नास्वामी स्टेडियमच्या लाल रंगाला ब्लू अँड गोल्डमध्ये रंगवूया
दोन महान शहरे, दोन महान टीम्स, दोन महान कॅप्टन्स, दोन महान चाहते आणि एक महान युद्ध.
चला मान्य करूया, वेळापत्रक बाहेर आले तेव्हा याच सामन्यावर तुम्ही खूण केली होती. आरसीबीच्या बालेकिल्ल्यात, गर्दीने भरगच्च मैदानात डब्ल्यूपीएलचा सर्वांत मोठा सामना खेळवला जाणार आहे. हा एक घराबाहेरचा सामना असेल परंतु मुंबई इंडियन्सच्या खूप सुंदर आठवणी या मैदानात आहेत, आपण आयपीएलमध्ये मागच्या सोळा वर्षांत अनेकदा लाल रंगाच्या समुद्राला टाचणी पडेल इतके शांत केले आहे.
दोन्ही टीम्सची सीझनची सुरूवात दणदणीत झालीये, त्यांनी आपले पहिले सामने अगदी अटीतटीने जिंकले आहेत, दुसरा सामना आरामात जिंकलाय आणि तिसरा हरले आहेत. त्या भुकेल्या आहेत आणि पहिल्या तीनमध्ये राहण्यासाठी उत्सुक आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच आहे.
तुमची शनिवार संध्याकाळ चांगली घालवण्यासाठी यापेक्षा दुसरा चांगला मार्ग असू शकत नाही.
काय: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध मुंबई इंडियन्स
कधी: १ मार्च २०२४ | सायंकाळी ७.३० वाजता
कुठे: चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू
काय अपेक्षा आहे: आपली कप्तान कौर पुन्हा वर्चस्व गाजवेल आणि आपण जिंकून घरी परत येऊ. एक सपाट खेळपट्टी जी तुम्ही फलंदाजी कराल तसे चांगली होत जाईल. आणि हो, क्युबन पार्कच्या जवळ असाल तर इयरफोन्स तयार ठेवा.