आरआयएलकडून क्रिकेट साऊथ आफ्रिकाच्या टी२० लीगच्या फ्रँचायझीचे रिलायन्स परिवारात स्वागत
क्रिकेटच्या क्षेत्रात आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढवत असताना रिलायन्स इंडस्ट्रीजने आज क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या आगामी टी२० लीगमध्ये फ्रँचायझी घेणार असल्याची घोषणा केली आहे. केप टाऊनमध्ये स्थित असलेली ही नवीन फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा ब्रँड पुढे नेईल आणि यूएईस्थित इंटरनॅशनल लीग टी२०टीम खरेदी करण्याच्या जवळ जाईल.
रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतात क्रिकेट फ्रँचायझी, फुटबॉल टीम्सची मालकी, खेळाचे प्रायोजकत्व, सल्ला आणि एथलिट टॅलेंट मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी आणून क्रीडा वातावरणात बदल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर त्यांनी उद्योगातील सर्वोत्तम पद्धती यात आणल्या आहेत. याशिवाय रिलायन्स फाऊंडेशन स्पोर्ट्स ही आरआयएलची सीएसआर संस्था भारताच्या ऑलिम्पिक चळवळीचे नेतृत्व विविध खेळांमध्ये चॅम्पियन्स तयार करण्याची संधी खेळाडूंना देते. त्याचबरोबर ती जागतिक क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत भारताचे नेतृत्व करते आहे. या वर्षाच्या सुरूवातीला सौ. अंबानी यांनी ४० वर्षांच्या अंतराने २०२३ मध्ये मुंबईत प्रतिष्ठेच्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी सत्राचे आयोजन करण्यासाठी यशस्वी बोली लावली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक सौ. नीता अंबानी म्हणाल्या की, “रिलायन्स कुटुंबात आमच्या नवीन टी२० टीमचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. मुंबई इंडियन्सचा अत्यंत निडर आणि मनोरंजक क्रिकेटचा ब्रँड दक्षिण आफ्रिकेत नेणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारताइतकेच क्रिकेटवर प्रेम करणारा हा देश आहे. दक्षिण आफ्रिकेकडे उत्तम क्रीडा वातावरण आहे आणि आम्ही या भागीदारीची शक्ती आणि क्षमता यांचा शोध घेण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही एमआयच्या जागतिक क्रिकेट पाया विस्तारत असताना खेळाच्या माध्यमातून आनंद आणि उत्साह सर्वंपर्यंत नेण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
रिलायन्स जिओचे अध्यक्ष श्री. आकाश अंबानी म्हणाले की, “आमच्या दक्षिण आफ्रिकन फ्रँचायझीसोबत आमच्याकडे तीन देशांमध्ये आता तीन टी२० टीम्स झाल्या आहेत. आम्ही आमचे क्रिकेट वातावरणातील सखोल ज्ञान आणि माहिती तसेच मुंबई इंडियन्सचा ब्रँड आणखी विस्तारित करून टीम बांधायला मदत करू आणि चाहत्यांना क्रिकेटचा अविस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करू.”