रोहित ओडीआयसाठी परतणार; स्काय परत एकदा टी-20 साठी उपकर्णधार

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आनंद होण्यासाठी आणखी एक कारण आहे. खुशखबरींची हॅट्ट्रिक झालीय ना! आम्हाला हे तुम्हाला कधी एकदा सांगतोय असं झालंय. नववर्षाचे यापेक्षा भारी गिफ्ट काय असू शकते?

बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले बोट फ्रॅक्चर झालेले असतानाही धुंवाधार फलंदाजी करणारा आपला हिटमॅन आता फिट अँड फाईन झालाय! फक्त एवढंच नाही तर तो श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करायला सज्जही आहे. आहे की नाही गुडन्यूज? आम्ही तर आतुर आहोत त्याचा खेळ बघायला.

आता आणखी एक सॉल्लिड गुडन्यूज! आपल्या सूर्यदादाचं प्रमोशन झालंय. भारताच्या टी-20 च्या उपकर्णधाराचे स्वागत आहे! सूर्यकुमार यादव, नावाप्रमाणेच पिचवर तळपणारा सूर्य! संपूर्ण मैदानभर चौकार षटकारांचा पाऊस पाऊस पाडणारा हा खेळाडू आता वरिष्ठ झालाय. त्याच्या करियरची कमान दिवसेंदिवस उंचावत चालली आहे.

आपला आणखी एक लाडका खेळाडू नुकताच द्विशतक झळकवून आलाय. कोण ते ओळखलं का? बरोबर! ईशान किशन. त्याची पांढऱ्या चेंडूच्या दोन्ही स्वरूपात जागा नक्की होतेय. त्याचं नाव टी-20 संघात भावी विकेट किपर म्हणून घोषित झालंय आणि आता त्याची जागा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघातही नक्की होईल असं दिसतंय.

आता 2023 च्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषकाची तयारी सुरू झालीय आणि ही मालिका त्या प्रवासाची सुरूवात ठरेल. आपली पलटन भारतीय संघाचा उत्साह वाढवायलाही सज्ज आहे.

टी-20 संघ- हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन (विकेट किपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अकझर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार

ओडीआय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेट किपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्झर पटेल, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग