वाढदिवसाला काय शुभेच्छा देतात? हॅप्पी बर्थडे, रोहित शर्मा!
पलटन आजचा दिवस काही साधासुधा दिवस नाहीये तर आपल्या सर्वांचा लाडका रोहित शर्मा याचा वाढदिवस आहे. अर्रे बर्थडे आहे भावाचा, जलसा साऱ्या गावाचा!!! 🥳
रो २०११ मध्ये #OneFamily मध्ये आला. तेव्हापासून त्याने आपल्या बॅटने अक्षरशः जादू केली आहे. तो आपला लाडका मुंबईकर आहे आणि त्याची स्माइल तर आपलं काळीज आहे.
मागच्या अनेक वर्षांत त्याने आपला लाडका ब्लू अँड गोल्ड परिधान करून प्रत्येक गोष्ट साध्यकेली. कर्णधार म्हणून ५ आयपीएल ट्रॉफीज, रात्रीच्या आकाशात सणसणत गेलेले अगणित षट्कार आणि सर्वांचे डोळे पांढरे करणारे विक्रम. 🤯
हिटमॅनने फक्त विक्रम केले नाहीत तर त्याने इतिहास रचला. त्याचे खास पुल्स आणि सामना बदलवून टाकणाऱ्या इनिंग्सनी संपूर्ण वानखेडेवर दणाणून टाकणारा जल्लोष साजरा केला गेला! 🔥
मैदानाबाहेरचा रो कसा आहे? तो आपल्या टीमचा उत्साह वाढवतो. मदत करतो. सर्वांना हसवतो आणि मनाने प्रेमळ आहे. हे पाहा रोहित आणि त्याची लाडकी गार्डनमध्ये फिरणारी पोरं …
…आणि फक्त टीममेट्सच नाहीत तर तुम्ही ट्रेनिंगमध्ये आणि खेळाडूंच्या मीटिंगमध्येही धमाल मस्ती करताना पाहाल. 👌 रोहित सोबत असला की मज्जा असतेच!
आपला मुंबईचा राजा एक वर्ष अधिक तरूण आणि शहाणा होतोय. तो आपल्या सर्व तरूण खेळाडूंसाठी प्रेरणा ठरतोय. 🤩
तो प्रत्येक शॉट सीमारेषेपलीकडे ठोकतो तेव्हा प्रत्येक मुंबईकर आपल्या घशाच्या नसा तुटेस्तोवर रोहिततत... रोहित....चा जल्लोष करतात. आणि हे कधीच थांबणार नाहीये!!! 🔊
तो एमआयसाठी फक्त एक क्रिकेटपटू नाही तर तो आपले कुटुंब आणि आपला कायमस्वरूपी हिटमॅन आहे. 💙 रोहितला रोहित म्हणून ओळख देणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्वाला शुभेच्छा … 🤝
**********
खरं म्हणजे केक खायला जायचंय पण जाता जाता आपल्या या लाडक्या खेळाडूने आपल्या नावावर केलेल्या विक्रमांची माहिती देऊन जातोय. मज्जा करा! ✨
• आयपीएलच्या इतिहासात ६००० + धावा करून हॅट ट्रिक करणारा एकमेव खेळाडू
• ५३९* – एमआयसाठी सर्वाधिक चौकार
• २६२* – एमआयसाठी सर्वाधिक षट्कार
• ५९७१* – एमआयच्या इतिहासात धावा करणारा आघाडीचा खेळाडू
• २०* – आयपीएलमध्ये सामनापटू पुरस्कार. ही कामगिरी करणारा एकमेव भारतीय खेळाडू
• आयपीएल अंतिम सामन्यात दोन अर्धशतके फटकावणारा एकमेव कर्णधार – २०१५ (२६ चेंडूंमध्ये ५०) आणि २०२० (५१ चेंडूंमध्ये ६८)