अज्ञात खेळाडूपासून महान खेळाडूपर्यंत: २००७ मध्ये या दिवशी #OnThisDay, रोने आपला टी२०आयचा प्रवास सुरू केला

🗓️ १९ सप्टेंबर २००७

📍 डर्बन

🍿 भारत विरूद्ध इंग्लंड, आयसीसी टी२० वर्ल्ड कप २००७

युवराज सिंगने याच सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूंवर षटकार ठोकले. याच सामन्यात मुंबईचा एक तरूण मुलगा मैदानात पहिल्यांदा उतरला. तो शांत आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण होता. तो होता आपलाच रोहित शर्मा.

त्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. परंतु त्याने इंग्लिश सलामी फलंदाज विक्रम सोळंकीला बाद करण्यासाठी एक अप्रतिम कॅच पकडली आणि या खतरनाक खेळाडूला बाद केले. यशस्वी होण्यापूर्वीच कमी योगदान पण मोठा प्रभाव त्याने साध्य केला. 😎 त्याच क्षणी चाहत्यांना कळले होते की या मुलामध्ये काहीतरी वेगळे आहे.

दुसऱ्याच दिवशी प्रोटीआजविरूद्ध सामन्यात रोने टी२०आयमध्ये प्रथमच आपली चुणूक दाखवली. चाहत्यांनी त्याचे खूप कौतुकही केले. त्याने ४० चेंडूमध्ये नाबाद ५० धावा करून भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध सेमी फायनलमध्ये पोहोचवले. त्या सामन्यात त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला सामनापटू पुरस्कार मिळाला.

सामन्याच्या शेवटी त्याने असे काही केले अनेक क्रिकेटपटूंना स्वप्नातही वाटले नव्हते. त्याच्या पहिल्याच सामन्यात वर्ल्ड कपचे मेडल गळ्यात पडले. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो असं म्हणतात ते उगाच नाही.

सप्टेंबर २००७ दक्षिण आफ्रिका ते जून २०२४ बार्बाडोस. हा रोहितचा टी२०आयमधला प्रवास एका सिनेमापेक्षा कमी नव्हता. तो या स्वरूपात फक्त खेळला नाही तर तो हे सामने जगला. 💥

त्याने केलेल्या अनेक मोठ्या कामगिरीबाबत बोलायचे तर या रन मशीनने टी२०आयमध्ये ४३२१ धावा करून सर्वकालीन सर्वाधिक धावा करणारा आघाडीचा फलंदाज म्हणून नाव कमावले आहे. मस्त ना. ⚡ आपल्या हिटमॅनने पाच शतके झळकवली असून या स्वरूपातील संयुक्तरित्या केलेली सर्वाधिक शतके आहेत. प्रत्येक कामगिरी त्याला गोलंदाज का घाबरतात आणि पलटनचा तो लाडका का आहे याचे प्रतीक आहे.

…आणि षट्कारांबाबत बोलायचे झाल्यास रोहितने अतिशय उत्तमरित्या सीमारेषा पार करण्याची कला साध्य केली आहे. 🎨 त्याने तब्बल २०५ षट्कार मारले. त्यामुळे २०० चा टप्पा पार करणारा तो एकमेव खेळाडू ठरला. एवढेच पुरेसे नव्हते म्हणून त्याने १५९ सामने खेळून सर्वाधिक टी२०आय सामने खेळणारा खेळाडू हा किताबही मिळवलाय.

एक कर्णधार म्हणून तो आणखी घातक ठरलाय. रोहित १०० पेक्षा अधिक षट्कार मारणारा एकमेव कर्णधार असून त्याने तोंडावर मारलं तर एक देईन हे वाक्य खूप गांभीर्याने घेतलेलं दिसतं.

२०२४ च्या विश्वचषक सामन्यात शेवटची टी२०आय स्पर्धा खेळताना त्याने भारताला विजयापर्यंत नेले आणि प्रत्येक आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा पहिलाच खेळाडू ठरला. रोने ट्रॉफी उंच पकडली आणि एक वर्तुळ पूर्ण करून १७ वर्षांनी चॅम्पियन म्हणून स्पर्धेचा निरोप घेतला. 🏆