एक रोमांच संपला! आपल्या दैदिप्यमान कसोटी क्रिकेट करियरमधून रोहित शर्मा निवृत्त

परीकथा कधी ना कधी संपतात. तसेच आपल्या हिटमॅनने या खेळाच्या सर्वाधिक शुद्ध स्वरूपातल्या आपल्या रोमांचक कारकीर्दीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.🏏

भारतीय क्रिकेट टीमच्या ओडीआय आणि कसोटी कर्णधार असलेल्या रोहित शर्माने खेळाच्या सर्वांत दीर्घ स्वरूपातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१० च्या दक्षिण आफ्रिकेच्या भारतीय दौऱ्यादरम्यान हा २२ वर्षीय मुंबईचा मुलगा पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करण्यासाठी सज्ज होता. परंतु सामन्याच्या सकाळीच व्यायाम करताना घोट्याला दुखापत झाल्यामुळे त्याला या मालिकेतून बाहेर राहावे लागले. 😕 

त्यानंतर तीन वर्षांनी त्याची मेहनत फळाला आली. आपल्या या सुपरस्टारचे स्वप्न सत्यात उतरले. त्याने नोव्हेंबर २०१३ मध्ये कसोटी पदार्पण केले आणि काहीतरी खास घडेल याची काळजी घेतली.

कसोटीच्या सफेद गणवेशांमध्ये त्याच्या या अद्वितीय कारकीर्दीला उजाळा देण्यासाठी वाचत राहा!

वेस्ट इंडिजचा भारतीय दौरा २०१३ | रोचा धुमाकूळ

ही मालिका सर्व स्वरूपातल्या खेळातून सचिन तेंडुलकरच्या समारोपासाठी ओळखली जाईल. आपल्या रोला कसोटी करियरमध्ये प्रवेश करण्यासाठी यापेक्षा जास्त चांगली पद्धत मिळू शकली नसती.

ईडन गार्डन्सवर पहिल्या कसोटीत सहाव्या क्रमांकावर आलेल्या या उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजाने २३ चौकार आणि एक षट्कार यांच्या मदतीने १७७ धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला एक इनिंग आणि ५१ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला. त्याला सामनापटू पुरस्कारानेही गौरवण्यात आले. अर्थात, ही फक्त एक सुरूवात होती...

त्याने पुढच्या सामन्यातही आपल्या पहिल्या सामन्याची कामगिरी सुरू ठेवली आणि नाबाद ११ धावा फटकावल्या. त्यामुळे आपल्याला एक इनिंग आणि १२६ धावांनी विजय मिळवता आला. रोहितला मालिकापटू पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या मास्टरब्लास्टरला अशा रितीने समारोप देण्यात आला. 👏

दक्षिण आफ्रिकेचा भारतीय दौरा २०१९ | सलामीवीर म्हणून पदोन्नती

२०१९ मध्ये दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी फलंदाजी क्रमवारीत त्याच्या आवडत्या स्थानावर परतल्यानंतर रोहितने धावांच्या वेगावर ब्रेक लावला नाही. त्याची गाडी तशीच सुसाट पळत होती.

कसोटी सलामी फलंदाज म्हणून पहिल्याच सामन्यात रोने दोन्ही इनिंग्समध्ये शतके झळकवली (१७६ आणि १२७) आणि विक्रमी १३ षट्कार मारले. त्यामुळे भारतीय क्रिकेट टीमला २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला.

या मालिकेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने एक पाऊल पुढे नेले आणि २८ चौकार व सहा षट्कारांसह २१२ धावांची कामगिरी केली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याने आपल्या खास स्टाइलमध्ये विचार व्यक्त केले. 😂

इंग्लंडचा भारत दौरा २०२१ | पुनरागमन, विजय आणि सर्वाधिक धावा

पहिल्या कसोटीत दणदणीत २२७ धावांचा फटका बसल्यानंतर टीम इंडियाने स्टाइलमध्ये पुनरामगन केले आणि मालिका ३-१ ने खिशात टाकली.

रोहित शर्माने यात महत्त्वाची भूमिका बजावली. तो भारतासाठी आघाडीचा धावा काढणारा खेळाडू ठरला. त्याने चार सामन्यांमध्ये ३४५ धावा फटकावल्या. त्यात एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट होते.

भारताचा इंग्लंड दौरा २०२१ | घरापासून दूर पहिले कसोटी शतक

ओव्हलवरील चौथ्या सामन्यात रोने दुसऱ्या इनिंगमध्ये अत्यंत सुंदर १२७ धावांची कामगिरी केली. त्याने या वेळी कसोटीमध्ये पहिले देशाबाहेरचे शतक फटकावले. त्यामुळे भारतीय संघाला खेळात बऱ्यापैकी पिछाडी घेतल्यानंतर पुनरामगन करणे शक्य झाले.

भारताने हा सामना १५७ धावांनी जिंकला. या वेळी रोहितला सामनापटू म्हणून गौरवण्यात आले. 💪

श्रीलंकेचा भारत दौरा २०२२ | कसोटी कर्णधार म्हणून पहिली मालिका

भारताचा कसोटी कर्णधार म्हणून मैदानात प्रथमच प्रवेश करताना रोहितने आपल्यावर काहीही प्रभाव पडू दिला नाही. त्याने टीम इंडियाला अगदी सहजपणे २-० ने विजय मिळवून दिला.

कसोटीमध्ये प्रथमच कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या आपल्या कर्णधाराकडून त्याचा अनुभव ऐकूया!

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ | कसोटी कर्णधार म्हणून पहिले शतक

नागपूरमध्ये झालेला बीजीटी २०२३ चा पहिला सामना रोहितसाठी अविस्मरणीय होता. त्याने कसोटी कर्णधार म्हणून नेमण्यात आल्यानंतर पहिले शतक फटकावले. या १२० धावा एक इनिंग आणि १३२ धावांनी विजयासाठी खूप महत्त्वाच्या ठरल्या.

याशिवाय भारतीय संघाने ही मालिका २-१ ने जिंकली. त्यामुळे त्यांना सलग दुसऱ्या वेळी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात जागा मिळाली! ✨

**********

रो, कसोटीच्या सफेद गणवेशात तुझी कमतरता नक्कीच जाणवेल! 💙 तुझ्या गार्डनमध्ये फिरणाऱ्या पोरांनाही तुझी कमतरता जाणवेल याची आम्हाला खात्री आहे! 🥹

ओडीआयमध्ये आम्ही तुला जादू करताना पाहणार आहोत, आम्ही त्याची वाट बघतोय! 🤌