सेमी फायनल २ | INDvENG पूर्वावलोकन: वानखेडेवर विजय मिळवूया
पलटन, आता वेळ आलीय ती वानखेडे स्टेडियमवर हाय व्होल्टेज सेमी फायनल सामन्यात गतविजेत्या भारताचा सामना इंग्लंडशी होण्याची. 🏟️. हे सामान्य मैदान नाही तर तो आपला बालेकिल्ला आहे. 💥 जल्लोष आणि प्रार्थना आणि तेही हजारोंच्या संख्येने स्टेडियमवर येणाऱ्या पलटनकडून होईल तेव्हा हा आवाज गगनाला भिडेल. घरच्या खेळपट्टीवर प्रत्येक चौकार आणि षट्कार मन जिंकून घेईल.
मागच्या आठ सुपर एड स्पर्धांमध्ये त्यांच्या नावावर समसमान विजय आहेत. परंतु या वेळी भारताला विजयाबाबत लोकांनी जास्त पसंती दिल्याचे दिसते. ✌️. भारतीय संघासाठी म्हणजे आपला दादा सूर्यकुमार यादव, कुंग फू पांड्या, तिलक वर्मा आणि बूम बूम बुमराह यांच्यासाठी ही खेळपट्टी ओळखीची आहे. ते सर्व एमआयचे खेळाडू आहेत. विल जॅक्स या वेळी ब्लू अँड गोल्डमध्ये खेळणार असून त्यालाही वानखेडेची ओळख नक्कीच होईल.
इंग्लंडकडे शक्ती आणि सामन्याचे ज्ञान आहे तर भारताकडे नियंत्रण आणि मधल्या फळीतला संयम आहे. टी२० वर्ल्डपमध्ये सेमी फायनलच्या टप्प्यात हे दन्ही संघ तिसऱ्या वेळी (२०२६) आमनेसामने येत आहेत. यापूर्वी ते २०२२ आणि २०२४ मध्ये समोरासमोर आले होते. 🤩
स्कायचे सुपला शॉट्स, ३६० डिग्री फटकेबाजी आणि उत्तुंग षट्कारांची लोकांना प्रतीक्षा असेल तर आदिल राशीदचे अप्रतिम स्पिन (७ सामन्यांमध्ये ११ विकेट्स) या वेळी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. सूर्याभाऊ हा भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून त्याने ७ सामन्यांमध्ये २३१ धावा केल्या आहेत. बूमच्या गोलंदाजीतील वैविध्यावर, वेग आणि पॉवर प्ले तसेच डेथ ओव्हर्समध्ये यॉर्करवर चाहते वेडे होणार आहेत. सध्या टी२० वर्ल्डपमध्ये त्याची इकॉनॉमी सर्वोत्तम म्हणजे ६.३० आहे. 💙💪
स्काय आणि कंपनी प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार हॅरी ब्रूकपासून थोडे सावध असतील कारण त्याने आधीच्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध खेळताना (५१ चेंडूंमध्ये १०० धावा) केल्या आहेत. टीव्ही राडा मचा देंगे मोड ऑन करून मधल्या फळीत धुमाकूळ घालायला सज्ज आहे. एचपीची डेथ ओव्हरमधली फटकेबाजी आणि नवीन चेंडूला स्विंग करण्याची क्षमता सर्वांसाठी आश्चर्यजनक असेल.
काय: सेमीफायनल| भारत विरूद्ध इंग्लंड
कधी: ५ मार्च २०२६ | सायं ७.०० वाजता
कुठे: वानखेडे स्टेडियम, मुंबई
काय अपेक्षा आहे: भारतीय संघाकडे अप्रतिम फलंदाजी आणि डावखुरे खेळाडू आहेत. इंग्लिश संघासाठी अप्रतिम फॉर्ममध्ये असलेला विल जॅक्स महत्त्वाचा ठरेल. त्याने ४ सामनापटू पुरस्कार मिळवले आहेत.
तर आता हे सगळे बुद्धिबळासारखे होईल. कोणाला परिस्थिती जास्त चांगली समजते, तणावाखाली उत्तम निर्णय घेण्याची क्षमता, चौकार आणि सिंगल थांबवण्यासाठी डायव्हिंग आणि कॅचेस या सगळ्यात वरचढ असलेली टीम विजयी ठरेल! 🙌