INDvSA कसोटी | पुन्हा एकदा आमनेसामने: प्रोटीआजचे कठीण आव्हान समोर
क्रिकेटच्या आणखी एका ब्लॉकबस्टरसाठी भारतीय संघ तयारीत आहे!
भारतीय क्रिकेट टीम येत्या १४ नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेचे स्वागत दोन कसोटी, तीन ओडीआय आणि पाच टी२०आय सामने खेळण्यासाठी करणार आहे. 🙌
इतिहास उघडून बघितल्यास ही मालिका आपल्याला एकामागून एक रोमांचाचा अनुभव द्यायला तयार आहे.
मागील काही वर्षांत भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधील सामने हे क्रिकेटमधल्या महान संघांचे मानले जातात. अत्यंत अटीतटीची स्पर्धा, रोमांचक फिनिशेस आणि चाहत्यांना अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे क्षण. पारंपरिक लाल चेंडूंचा सामना असो वा सफेद चेंडूने फटकेबाजी, या दोन्ही तुल्यबळ संघांनी चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. 🔥
आठवणींना उजाळा देताना आपल्याला अनेक घटना आठवतात- २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमधील सेहवाग आणि युवराज यांची देखणी कामगिरी, २००६ मध्ये जोहान्सबर्गमधील लुटालूट आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिला कसोटी विजय, चेपॉकवर २००७ मध्ये सेहवागचे त्रिशतक, २०१० मध्ये ग्वाल्हेरमध्ये तेंडुलकरच्या १४७ चेंडूंमधल्या अप्रतिम २००* धावा आणि ओडीआयमध्ये द्विशतक नोंदवणारा पहिलाच पुरूष क्रिकेटपटू म्हणून ओळख आणि सूर्याचा टी२० वर्ल्ड कप २०२४ चषक उचलण्यापूर्वीचा “लाँग ऑफ, लाँग ऑफ…” चा क्षण. नॉस्टॅल्जिक वाटतंय की नाही?! 🥹
अर्थातच, प्रोटीआजचा कसोटी आणि ओडीआयमध्ये वरचष्मा आहे. पण टी२० मध्ये मात्र हे वर्ल्ड चॅम्पियन्स आघाडीवर आहेत.
हेही वाचा 👉 India’s squad for two Tests vs SA
भारतीय संघाने टी२०य आणि भारतीय भूमीवर एक चांगले नाव कमावले आहे. ते आता हेच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गर्दीत, प्रत्येक उत्साह आणि आवाज आपल्या काळजात असेल. - इंडियायायाया, इंडिया! 🇮🇳
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका - आकडेवारी
|
कसोटीमध्ये एकास एक आकडेवारी |
||
|
भारत |
टीम |
दक्षिण आफ्रिका |
|
१६ |
विजय |
१८ |
|
१८ |
पराभव |
१६ |
|
१० |
बरोबरीत |
10 |
|
सचिन तेंडुलकर (१७४१) |
सर्वाधिक धावा |
जॅकस कलिस (१७३४) |
|
अनिल कुंबळे (८४) |
सर्वाधिक विकेट्स |
डेल स्टेन (६५) |
**********
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका – ओडीआय आकडेवारी
|
ओडीआयमध्ये एकास एक आकडेवारी |
||
|
भारत |
टीम |
दक्षिण आफ्रिका |
|
४० |
विजय |
५१ |
|
५१ |
पराभव |
४० |
|
३ |
अनिर्णित |
३ |
|
सचिन तेंडुलकर (२००१) |
सर्वाधिक धावा |
जॅकस कलिस (१५३५) |
|
अनिल कुंबळे (४६) |
सर्वाधिक विकेट्स |
शॉन पोलॉक (४८) |
**********
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका – टी२०आय आकडेवारी
|
टी२०आयमध्ये एकास एक आकडेवारी |
||
|
भारत |
टीम |
दक्षिण आफ्रिका |
|
१८ |
विजय |
१२ |
|
१२ |
पराभव |
१८ |
|
१ |
अनिर्णित |
१ |
|
रोहित शर्मा (४२९) |
सर्वाधिक धावा |
डेव्हिड मिलर (५२४) |
|
अर्शदीप सिंग (१८) |
सर्वाधिक विकेट्स |
केशव महाराज (१५) |