जस्सी धुरळा उडवायला तयार, स्पायडीचा कमबॅक: INDvSA कसोटीसाठी संघाची घोषणा

तुमचे सीटबेल्ट घट्ट लावून घ्या 🔥

भारतीय क्रिकेट संघाने १४ नोव्हेंबरपासून घरच्या खेळपट्टीवर सुरू होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे.

या १५ सदस्यांच्या टीममध्ये ऑक्टोबर २०२५ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध २-० ने कसोटी मालिका जिंकणाऱ्या बहुतांश खेळाडूंचा समावेश आहे.

या वर्षाच्या सुरूवातीला इंग्लंडमधील सर्वोच्च दर्जाची कामगिरी करणारे दोन खेळाडू ऋषभ पंत आणि आकाश दीप संघात परतले आहेत. ते एन. जगदीशन आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याऐवजी खेळणार आहेत.

जुलै २०२५ मध्ये मँचेस्टर कसोटीत पायाला दुखापत झालेला स्पायडी उपकर्णधार म्हणून परतला आहे.

दरम्यान आपला बूम बूम बुमराह ज्याला लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये प्रोटीआजविरूद्ध खेळायला आवडते तो गोलंदाजांचे नेतृत्व करेल. या जलदगदी गोलंदाजाने २०.७६ च्या सरासरीने आठ कसोटी सामन्यांत ३८ विकेट्स घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णशा), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप

**********

स्टारबॉय, नमन धीरकडे मोठी भूमिका

पलटन, आम्ही तुमच्यासाठी दोन चांगल्या बातम्या घेऊन आलोय!

दक्षिण आफ्रिका ए विरूद्ध तीन एकदिवसीय सामन्यांसाठी तिलक वर्माला इंडिया ए च्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर नमन धीरला १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ साठी इंडिया ए संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे.

खूप शुभेच्छा पोरांनो!