अरे हा सूर्यादादा? हा तर आपला रेकॉर्ड्सदादा!
या मोसमात कुठल्याही स्टेडियमच्या छतावरून सूर्यकुमार यादवच्या नावाचा जयघोष ऐकू आला नाही असे झाले नाही. 🤩 त्याने आयपीएल २०२५ मध्ये चांगलाच धुमाकूळ घातलाय!🔥
जेव्हा जेव्हा परिस्थिती कठीण झाली तेव्हा तेव्हा आपल्या या मि. ३६०° ने मैदानात उतरून आपली चुणूक दाखवली. प्रत्येक सामन्यात, तणावाखाली असताना स्कायने अत्यंत शांत, संयम दाखवून त्याच्या सिग्नेचर फटक्यांसह मैदान गाजवले. मग ते सुपला असो किंवा स्वीपला असोत. त्याने गोलंदाजांना चांगलेच पेचात पाडले.
सूर्याने १६ सामन्यांमध्ये ६५.१८ च्या सरासरीने ७१७ धावा करून मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून नाव नोंदवले. त्याने मैदानात आपले नेतृत्व तर केलेच पण एकाच आयपीएल हंगामात ७००+ धावा करणारा पहिला नॉन-ओपनिंग फलंदाज म्हणून इतिहासात आपले नाव कोरले.
त्याने या सीझनमध्ये सुरूवातीला दोन नवीन विक्रमही नोंदवले. 😯 हे बघा, हेच ते विक्रम. TAP HERE TO READ!
त्याने फक्त धावा केल्या नाहीत तर खेळ पालटला, खेळाची दिशा बदलली आणि चाहत्यांमध्ये विश्वास जागवला. 🙌 एमआयच्या पुनरागमनाचे काळीज होती त्याची फलंदाजी. त्याने आपल्याला या मोहिमेत कठीण सुरूवातीतून बाहेर काढण्यास मदत केली.
स्कायदादा, तू केलेल्या तोडफोडीसाठी तुझे खूप आभार. तू जेव्हा जेव्हा मैदानात होतास तेव्हा 25+ score याची खात्री होती आम्हाला!
पुढच्या सीझनमध्ये आपल्या खास ब्लू अँड गोल्डमध्ये नुस्ता राडा करण्यासाठी तुझी प्रतीक्षा असेल... 💙