पॉपकॉर्न तयार ठेवा. कारण सुपला सूर्यादादा कमबॅक करतोय!
क्रिकेटच्या वर्तुळात पुन्हा एकदा कोणाच्या नावाची चर्चा आहे सांगा बरं? 🌌
अगदी बरोबर. आशिया कप २०२५ साठी आपला लाडका सूर्यकुमार यादव ग्रँड प्रवेश करायला तयार आहे आणि चाहत्यांना आत्ताच खूप आनंद झालाय.
दुखापतग्रस्त झाल्यामुळे एक छोटासा ब्रेक घेतल्यानंतर सूर्यादादा पुन्हा एकदा मैदानात यायला तयार आहे. त्याचा आयपीएल २०२५ चा फॉर्म कायम असला तर आपल्याला फटकेबाजी, आतषबाजी पाहायला नक्कीच मिळेल. 🎆
त्याच्या शॉट्समुळे गोलंदाजांना चक्कर आली होती ते आठवतं का? त्याचे ते अप्रतिम शॉट्स, त्याचे ते स्कूप्स, फ्लिक्स आणि दणदणीत षट्कार. म्हणजे भरपूर मालमसाला. आपल्या मि. ३६० ने अगदी लिलया रेकॉर्ड्स मोडले आहेत आणि आपल्याला ते हवेहवेसे वाटू लागले आहेत.
…आणि म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. 💪 त्याच्या दर्जाच्या खेळाडूसाठी दुखापत होणं ही फक्त एक छोटी घटना आहे. तो आव्हानांचे रूपांतर कमबॅक्समध्ये करतो आणि कमबॅक्सचे रूपांतर हायलाइट्समध्ये करतो. त्याची ती धावांची भूक, त्याची ऊर्जा आणि त्याचा निडर स्वभाव यांच्यामुळे तो चाहत्यांचा लाडका आणि गोलंदाजांसमोर एक आव्हान ठरलाय.
आशिया कप २०२५ जवळ येत असताना हा उत्साह शिगेला पोहोचलाय कारण भारताचा टी२०आय कर्णधार मधल्या फळीत असतो तेव्हा तुम्ही फक्त क्रिकेट बघत नाही तर त्याचा अनुभव घेता.
स्पर्धेला पूर्ण निळ्या रंगात रंगवायची वेळ आलीय! 💙 लेट्स गो. टीम इंडिया! 🇮🇳