घोषणा: स्काय, एचपी, बूम, टीव्ही- आशियावर विजय मिळवण्यासाठी एमआयचा संघ तयार

स्टेज तयार आहे, नगारे वाजत आहेत आणि भारतीय क्रिकेट टीमने आशिया कप २०२५ साठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. अरे यार, वर्चस्व गाजवून चमकदार कामगिरी करण्यासाठी संघ तयार झालाय! 🔥

२०२४ वर्ल्ड कपनंतर टी२०आयमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर आणि २० सामन्यांमध्ये १७ सामने जिंकल्यानंतर विजयी संघ स्पर्धेत आत्मविश्वास आणि उत्साहाने सहभागी होत आहे.

… आणि कल्पना करा? #OneFamily उत्साहाने ओसंडून वाहतेय! सूर्यकुमार यादव आपल्या टीमचे नेतृत्व करून आकाशाला <आणि स्पर्धेला > आपल्या राड्यासह गवसणी घालायला तयार आहे. 🤩

दरम्यान हार्दिक पांड्या आपल्या मॅक्स ऑरा मोडमध्ये परतेल तर आपला अल्टीमेट गेम चेंजर आणि आपला स्टारबॉय तिलक वर्मा त्याच्या निडर अवतारात येईल.

आपला लाडका राष्ट्रीय खजिना जसप्रीत बुमराहसुद्धा आहे बरे का. त्याला आपली कामगिरी उत्तमरित्या कशी पार पाडायची हे चांगलेच माहीत आहे. 💥 ही टीम अनुभव, ताकद आणि तरूणाईचा उत्साह आपल्यासोबत घेऊन येईल.

📝 टीम इंडिया आशिया कप २०२५ संघ 📝

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅम्सन, हर्षित राणा, रिंकू सिंग

राखीव खेळाडू: प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल

**********

आशिया कप २०२५ मध्ये फक्त आपला मुकुट कायम ठेवायचा नाहीये तर पुढच्या वर्षाच्या सुरूवातीच्या टप्प्यात होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप २०२६ पूर्वी आपल्याला एक मोठा आणि महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे. 🙌 इथे यशस्वी मोहीम म्हणजे भारत अत्यंत विश्वासाने या मोठ्या इव्हेंटमध्ये सहभागी होईल आणि चषक जपणारी पहिली टीम होण्याचे ध्येय समोर ठेवेल.

तर तयार व्हा कारण चषकाचे रक्षण करायचे आहे आणि भारतीय संघ आपल्यासाठी आशिया कप जपण्यासाठी सज्ज आहे.

टीम इंडिया आशिया कप २०२५ वेळापत्रक

टप्पा

तारीख

प्रतिस्पर्धी

स्थळ

वेळ (आयएसटी)

ग्रुप बी

१० सप्टेंबर

संयुक्त अरब अमिराती

दुबई

सायं ७.३० वाजता

ग्रुप बी

१४ सप्टेंबर

पाकिस्तान

दुबई

सायं ७.३० वाजता

ग्रुप बी

१९ सप्टेंबर

ओमान

अबूधाबी

सायं ७.३० वाजता

सुपर फोर

२०-२६ सप्टेंबर

*पात्रतेच्या सापेक्ष

सायं ७.३० वाजता

अंतिम

२८ सप्टेंबर

*पात्रतेच्या सापेक्ष

सायं ७.३० वाजता