२०२२ मध्ये #OnThisDay – ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहममध्ये स्कायचा शो!

पहिल्या गोष्टी नेहमीच खास असतात आणणि आपल्या लाडक्या शोस्टॉपरसाठी तर नक्कीच खास होती.

१० जुलै २०२२ रोजी सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक नोंदवले. तेदेखील आपल्या खेळाच्या सर्वांत आवडत्या स्वरूपात! 🔥

ब्रिटिश टीमच्या जबरदस्त हल्ल्याविरूद्ध खेळताना, तणावाखाली असताना आणि अतिप्रचंड म्हणजे २१५ इतक्या धावसंख्येचा पाठलाग करताना दादाने असा काही मास्टरक्लास दिला की संपूर्ण जगाने तोंड वासले.

भारतीय संघ ३/३१ अशा गंभीर परिस्थितीत असताना तो डगमगला नाही. सूर्याने गियर्स बदलले आणि आव्हानांतून आपला मार्ग शोधला. ३६०° शॉट्स? नो लुक सिक्सेस? त्याने हे सर्व अत्यंत उत्कृष्टतेने पार पाडले. ✅

त्याने फक्त ५५ चेंडूंमध्ये जबरदस्त ११७ धावांनी ट्रेंट ब्रिजचा कानाकोपरा सजवला. आजपर्यंतची ही त्याची सर्वोच्च टी२० धावसंख्या आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना तर काय होते आहे तेच कळेना...

भारताला त्या दिवशी पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण करता आला नाही. आपण १७ धावांनी कमी पडलो. परंतु सूर्याच्या इनिंग्स? त्याने मने जिंकली, हेडलाइन्स तयार केल्या आणि स्पष्ट तसेच जोराने घोषणा केली की तो या सर्वांत मोठ्या स्टेजवर सूर्यासारखा तळपण्यासाठी आला आहे. 💥

हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक होते. परंतु त्याने या पूर्वी किमान १०० वेळा अशी कामगिरी केली असावी असे वाटणारे होते. शांत, संयमी आणि जबरदस्त सीमारेषा ओलांडणारा हा खेळाडू सर्वांचा लाडकाच आहे.

त्याने नंतरच्या काही वर्षांमध्ये टी२० मध्ये आणखी पाच शतके केली. त्यातील दोन मुंबई इंडियन्ससाठी केली. यातले प्रत्येक शतक त्याच्याइतकेच ग्रेसफुल होते. थोडक्यात सांगायचे तर तू खऱ्या अर्थाने एकच वादा, सूर्या दादा आहेस! 👏