IndvNAM report: किशन, एचपीचे अर्धशतक, वरुणच्या खेळामुळे नामिबियाचा सुपडा साफ
भारताचा T20 – 2026 विश्वचषकाचा दुसरा सामना एक कार्निव्हल ठरला. भारताच्या जबरदस्त सुरुवातीपासून ते नामिबियाच्या लढ्यापर्यंत आणि नंतर झालेला पराभव हे सर्वच भारतासाठी केकवॉकसारखं ठरलं.
नामिबियाने प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलेल्या स्कायच्या मेन इन ब्लूने 4.3 ओव्हर्समध्ये 50 धावा पार केल्या तर 100 धावा फक्त 6.5 ओव्हर्समध्ये पार केल्या. ईशानने 24 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या आणि हार्दिकच्या 28 चेंडूंमध्ये 52 धावांनी भारताला 209/9 धावांपर्यंत पोहोचवले.
नामिबियाने खेळायला सुरूवात केली तेव्हा ते अत्यंत आशावादी होते. त्यांनी पहिल्या चार ओव्हर्समध्ये 33 धावा केल्या. स्पिन खेळाडू वरूण चक्रवर्ती (3/7) आणि अक्षर पटेल (2/20) यांनी त्यांच्या खेळाला ब्रेक लावले आणि 93 धावांनी विजय नोंदवला.
सामना कसा झाला ते पाहूया.
पॉकेट डायनॅमोची तोडफोड.
त्यानंतर संजू सॅमसनने 8 बॉलमध्ये 22 धावा केल्या. सलामी फलंदाज ईशान किशनने भारताला 6.5 ओव्हर्समध्ये 100 धावांपर्यंत नेले. पॉकेट डायनॅमोने 20 चेंडूंमध्ये टी 20आयचे आठवे अर्धशतक नोंदवले. सहाव्या ओव्हरमध्ये त्याने धुमाकूळ घातला.
5.1 : शून्य
5.2 : 6
5.3 : 6
5.4 : 6
5.5 : 6
5.6 : 4
नामिबियाचा स्टॉप!
नामिबियाचा कर्णधार जेरार्ड इरासमस आणि बर्नाड स्कोल्ट्स यांनी मधल्या फळीत ताबा घेतला. त्यांनी ईशान किशन, स्काय आणि तिलक वर्मा यांना बाद केले. पण त्यानंतर हार्दिक नावाचं वादळ आलं. त्याने भारताला पुन्हा वेग मिळवून दिला. अवघ्या 27 चेंडूनमध्ये त्याने टी20आयमधले अर्धशतक पूर्ण केले. तब्बल 185.71 च्या स्ट्राईक रेटने त्याने केलेल्या धावांमुळे भारतीय संघ 209/9 पर्यंत गेला.
भारताची पहिली विकेट, अर्शची 250 वी टी20 वी विकेट
अरूण जेटली स्टेडियमवर 40000 पेक्षा अधिक चाहत्यांच्या गर्दीत नामिबियाने चार ओव्हर्समध्ये 33 धावा केल्या. पण अर्शदीपने पहिली विकेट घेतली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला.
या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाने एक जबरदस्त बॉल टाकला आणि त्यामुळे जेन फ्रायलिंकला डीप मिडविकेटवर शिवम दुबेकडे कॅच द्यायला भाग पाडले. ही टी20 क्रिकेटमधली अर्शदीपची पहिली विकेट ठरली.
नामिबियाचा संघ वरुणच्या जाळ्यात अडकला.
वरुण चक्रवर्तीने पहिल्या 12 चेंडूत एक असे जाळे टाकले ज्यात नामिबियाच्या तब्बल 3 विकेट पडल्या.
पहिली विकेट- लॉरेन स्टीनकॅम्प बाद.
दुसरी विकेट - जेन निकोल लेफ्टी एटानला लाँग ऑफवर बाद केले.
तिसरी विकेट- जेजे स्मितकडे एक गुगली. त्यामुळे त्याला स्लॉग स्वीप मारता आला नाही आणि तो बाद झाला.
अॅक्स-इफेक्ट
अक्षर पटेलने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा दिल्यानंतर नामिबियाला चांगलाच धक्का दिला. त्याने 11 व्या ओव्हरमध्ये ( त्याच्या दुसऱ्या) पहिली विकेट घेतली आणि मग 13 व्या ओव्हरमध्ये मालन क्रूगरला घरी पाठवले. मग आपल्या लाडक्या जसप्रीत बुमराहनेही एक महत्वाची विकेट घेतली.
खरं म्हणजे बुमराह यावेळी एकही विकेट घेणार नाही असे वाटले होते. असे काही नाही बरे का! आपल्या या यॉर्कर मास्टरने रूबेन ट्राम्पेलमन पॅव्हेलियनला पाठवले.
अंतिमतः शिवम दुबेने झेन ग्रीनला चूक करायला भाग पाडले आणि हिट विकेट करून नामिबियाला बाद केले.
या विजयासह आपला दादा सूर्या आणि टीमने या स्पर्धेत 2-0 ने आघाडी घेतली आहे आणि पुढच्या सामन्यात जाताना प्रचंड आत्मविश्वास आहे.
भारताने:-
93 धावा: स्पर्धेतला सर्वांत मोठा विजय
86-1 स्पर्धेतला सर्वोत्तम पॉवर प्ले स्कोअर
6.5 ओव्हर: टी20 कपच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान शतक.
आता पुढे? भारत विरुद्ध पाकिस्तान.
थोडक्यात धावसंख्या: भारत 209/9 (ईशान किशन 61, हार्दिक पांड्या 52, जेरार्ड इरासमस 4/20) कडून नामिबियाचा 116 (लॉरेन स्टीनकंप 29, वरून चक्रवर्ती 3/7) 93 धावांनी पराभव.