टी२० विश्वचषक २०२६: स्कायचे मेन इन ब्लू- संघाची घोषणा आणि तयारी
काऊंटडाऊनचा टायमर आता सुरू झालाय. स्पर्धेला ५० दिवसांपेक्षाही कमी दिवस असताना विद्यमान चॅम्पियन्स असलेल्या टीम इंडियाने सलग तिसऱ्या वेळी आयसीसी मेन्स टी२० विश्वचषक घरी आणण्यासाठी संघाची घोषणा केली आहे.
निर्भय. शूरवीर. आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले सूर्यकुमार यादवचे मेन इन ब्लू-जगातली सर्वोच्च दर्जाची टी२०आय टीम २०२४ पासून प्रचंड फॉर्ममध्ये आहे. त्यांनी आशिया कप २०२५ जिंकला आणि खेळलेल्या प्रत्येकी द्विसंघीय मालिकेत/ स्पर्धेत १०० टक्के रेकॉर्ड कायम ठेवला आहे.
आपला दादा सूर्या टी२०डब्ल्यूसी२०२६ मध्ये कुंगफू पांड्या, स्टारबॉय तिलक टीव्ही शर्मा आणि बूम बूम बुमराह यांच्यासोबत वन फॅमिलीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. हे सर्व अत्यंत उत्साहात असून एमआयचा ऑरा दाखवण्यासाठी आणि ट्रॉफी घरी आणण्यासाठी तयार आहेत.
२०२४ च्या विजयापासून धडा घेऊन आणि जिंकण्यासाठी नव्याने सज्ज असणारी स्काय आणि टीम इंडिया मनोरंजनासाठी आणि विजयासाठी सज्ज आहे.
तर तयार व्हा! मिशन टी२० विश्वचषक २०२६ 🏆 आताटेकऑफसाठी सज्ज आहे.
📝 टीम इंडिया- टी२० विश्वचषक २०२६ साठी संघ 📝
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅम्सन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर