बॉन्ड आणि बूमशी बोलल्यामुळे मला माझी ताकद कळलीः डॅन सॅम्स

आमच्या ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज डॅनियल सॅम्सने ९ मे रोजी असलेल्या आमच्या कोलकाता नाइट रायडर्सविरूद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

सॅम्स हा गुजरात टायटन्सविरूद्ध आमच्या रोमांचक विजयातला तारा होता. त्याची सीझनमधली सुरूवात जगा डळमळीत झाली. पण तो नंतर उसळून बाहेर आला. त्याने या बदलासाठी दोन व्यक्तींना प्रामुख्याने श्रेय दिले. 

“मी शेन बॉन्ड आणि जसप्रीत (बुमरा) यांच्यासोबत काम केले. आपण फलंदाजांसाठी कायम नियोजन करू शकतो. परंतु जसप्रीतकडे यॉर्कर चालवण्याची शक्ती आहे. ती त्याची ताकद आहे. मग फलंदाज काहीही करोत. त्यांच्यासोबत साधलेल्या संवादामुळे मला हे कळले की मी फक्त फलंदाजांच्या कमजोरीवर भर देत होतो. माझ्या ताकदींवर नाही,” सॅम्स म्हणाला. 

“शेवटच्या ओव्हरसारख्या कठीण परिस्थितीत माझ्या बाजूने टक्केवारी जिंकण्याचा विषय होता आणि त्याचबरोबर मी सर्वोत्तम कामगिरी करू शकेन याचाही. माझे आवडते चेंडू हे स्लो प्रकारातले आहेत. अर्थात एकच प्रकार पण मी तो विविध टप्प्यांवर टाकू शकतो. बॉन्डीसोबत हाच संवाद झाला. कोन समजून घेणे आणि बारीक तपशील. त्यातून काय उपयुक्त ठरू शकते हे ठरवणे आणि त्यादृष्टीने सरावादरम्यान काम करणे या गोष्टी आम्ही केल्या,” त्याने सांगितले. 

या सीझनच्या सुरूवातीला केकेआरविरूद्धच्या सामन्यात सॅम्सला कमी गुण मिळाले. त्याने पॅट कमिन्सला टाकलेल्या एका ओव्हरमध्ये ३५ धावा दिल्या. या जलदगती गोलंदाजाने हे मान्य केले की त्याला ते स्वीकारणे जरा कठीण गेले. परंतु तो त्या स्थितीतूनही बाहेर आला. 

“तुम्ही जे काही करता त्यावर प्रश्न विचारता. हे नैसर्गिक आहे. सर्वच खेळाडू हे करतात. मला त्यापासून पुढे निघायला आणि मला यातून काय शिकता येईल हे पाहायला वेळ लागला. इथे सगळेच खूप छान आहेत. मी पूर्वी काय केले आहे, मी आतापर्यंत काय साध्य केले आहे याबाबत संवाद होतात. आधीचे फुटेज बघून आणि बॉन्डी, महेला आणि जसप्रीत यांच्याशी चर्चा करून मला मी सर्वोत्तम गोलंदाजी करत नव्हतो हे जाणवले,” सॅम्स म्हणाला. 

जीटीविरूद्धच्या विजयामुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आहे का असा प्रश्न विचारला असता सॅम्सने टीमला सर्वाधिक मदत झालेल्या एका घटकाबाबत चर्चा केली. 

“आमच्या आत्मविश्वासासाठी शेवटचा विजय खूप महत्त्वाचा होता. निकालापेक्षाही त्या परिस्थितीत आम्ही मानसिकदृष्ट्या कसा सामना केला हे महत्त्वाचे होते. आमच्यासाठी आता उर्वरित सामने हे मिनी टूर्नामेंटसारखे आहेत. एक खेळाडू म्हणून आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. एका सामन्यापेक्षा दुसरा सामना महत्त्वाचा नाही. सीझन चांगल्या प्रकारे संपवण्यासाठी आम्ही प्रतय्न करतोय आणि आम्हाला आगामी सामन्यांमध्ये किती चांगली टीम आहोत हे सिद्ध करायचे आहे,” तो म्हणाला. 

सॅम्सकडून आलेल्या काही प्रामाणिक उत्तरांमधून तो कमी गुणांपासून पुढे कशा प्रकारे आला हे कळते. त्यामुळे आपल्याला खूप प्रेरणा मिळते आणि आम्हाला आशा आहे की या दोन सलग विजयांचा उत्साह आम्हाला पुढच्या सामन्यातही उपयोगी ठरेले!