खूप खूप आभार, पलटन– इथल्या प्रत्येक चाहत्यासाठी, आनंद, दुःखाच्या क्षणांसाठी!

आणि टाटा आयपीएल २०२५ मधल्या जबरदस्त रोलर कोस्टर राइडवर पडदा पडला आहे. हा प्रवास सोपा होता का? अजिबात नाही. पण तो आनंददायी, शक्तिशाली आणि आपल्याला कायमस्वरूपी अविस्मरणीय आठवणी देणारा होता का? अर्थातच! 💙

मागच्या सीझनमध्ये अगदी शेवटच्या क्रमांकावर थांबलो. तेव्हापासून या वेळी टॉप ३ मध्ये आलो. ही टीम मुंबईसारखी खेळली. कसला जबरा कमबॅक होता! 🔥

आपण संथ सुरूवात केली आणि अडखळलोही खूप. पण आपण थांबलो नाही. टीमने स्वतःला पुन्हा उभे केले, मेहनत केली आणि एकामागून एक सहा विजय मिळवले six back-to-back wins त्यामुळे आपण खेळात परतलो! 🎬

बॉइन इन ब्लू अँड गोल्ड- तुम्ही खऱ्या अर्थाने योद्धे आहात. तुम्हाला दुखापती झाल्या, ताणतणाव आले आणि परिस्थिती आव्हानात्मक झाली. परंतु तुम्ही मुंबई स्पिरिट जिवंत ठेवलेत. 💪 तुम्ही काळीज हातात घेऊन खेळलात आणि म्हणूनच ही #OneFamily स्पेशल ठरते.

… आणि आमची लाडकी पलटन... तुम्ही प्रत्येक शहरात प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात आणि स्टँडला निळ्या रंगाने रंगवून टाकले. तुम्ही आपल्या संघाच्या कठीण परिस्थितीही पाठीशी उभे राहिलात. जिंकलो किंवा हरलो तरी तुम्ही उत्साह आणि ढोल कायम ठेवलेत आणि जीव लावलात. 🙌 तुम्ही आपल्या संघाच्या पाठीचा कणा आहात.

या वेळी आपण थोडक्यात हरलो. पण आपण दिलेला लढा, एकता आणि प्रेम... हे खऱ्या अर्थाने विजयी ठरवणारे आहे.

आम्ही परत येऊ.... पुन्हा येऊ... अधिक मजबूत, अधिक उत्साही आणि तयारीत येऊ. तोपर्यंत आपला उत्साह आणि प्रेम असेच कायम राहू द्या. तुमचा जयघोषही कायम राहू द्या. ⚡

🎤मुंबई इंडियन्स ब्लू अँड गोल्डआणि एक विजय नावावरकोण आहोत आपण??? मुंबई इंडियन्स!!!!” – हा जयघोष आपल्या काळजावर कोरला गेलेलाय.

तुमचा उत्साह, जादू आणि प्रेम यांच्यासाठी खूप आभार. पलटन, सप्रेम द्या निरोप... बहरून जात आहे! 🥹