“पलटन आमची धडकन आहे”: हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्याशी संबंधित एक शब्द आहे. तो म्हणजे ऑरा. हा ऑरा वानखेडे नावाच्या मैदानात उतरतो तेव्हा त्यातून जो उत्साह निर्माण होतो तो अद्वितीय असतो. आयपीएल २०२६ मध्ये या उत्साहाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.
मागच्या अकरा वर्षांत हार्दिक पांड्या एक अत्यंत साधा, कच्चा लिंबूपासून अतिशय सॉलिड, तडफदार, पलटनच्या गळ्यातला ताईत झाला आहे. तो अनेकांची प्रेरणा आहे. मुंबई इंडियन्सचा अनुभव, एकूण मिक्स आणि ब्लू अँड गोल्डमधल्या चाहत्यांबाबत बोलत असताना त्याने या स्टारडमपर्यंत आणणाऱ्या त्याच्या परिश्रमाबाबत सांगितले.
“मी मुंबई इंडियन्समध्ये खेळण्यापूर्वी तब्बल १९ वर्षे मी फक्त एक फलंदाज होतो,” तो म्हणाला. “मला फक्त एकच गोष्ट माहीत होती ती म्हणजे कुणी १२ फेऱ्या मारायला सांगितल्या तर मी १५ मारायच्या आहेत. अचानक कोणीतरी मला पाहिले आणि त्यानंतर एक वर्षाने मी रणजी ट्रॉफीत खेळलो. मग अचानक एके दिवशी मुंबई इंडियन्सची निवड टीम स्टँड्समध्ये होती. ते मला खेळताना बघायलाही आले नव्हते. हीच तर खरी गंमत आहे. सुदैवाने दैव बलवत्तर होते. मी त्या सामन्यात उत्तम खेळलो. ते मला बघायला आले नव्हते परंतु त्यांनी हे ओळखले की या मुलामध्ये काहीतरी खास आहे आणि तो आपल्या टीमसाठी दीर्घकाळ खेळू शकेल. एमआय स्काऊटिंग अशाच प्रकारे काम करते. हे फार मस्त आहे.”
तो अजूनही त्याचा खेळ असाच करतो. प्रचंड मेहनत करा, नेहमीपेक्षा जास्त मेहनत करा, चेंडू सीमापार टोलवा आणि तुम्ही नशीबवान ठरता.
“मला फक्त मेहनत माहीत होती. कोणीही कितीही दूर लोटूदे. जग उलटेपालटे झाले तरी चालेल. माझ्यापासून माझी मेहनत कुणीही खेचून नेऊ शकत नाही.”
आता वानखेडेच्या चाहत्यांबाबत. ते एका पहाडासारखे मागे उभे असता. मुंबई इंडियन्सच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. मागच्या एकोणीस सीझनमध्ये टीमला चालना देणारे हेच इंधन आहे.
“मी खूप मनापासून सांगतो. मला प्रेम मिळवायला खूप आवडते. लोक जल्लोष करतात आणि काहीही झाले तरी ते आमच्या पाठीशी आवडतात हीच आमच्यासाठी उत्साहाची गोष्ट असते. जिंकलो तरी आणि हरलो तरी ते आम्हाला कधीही सोडतत नाहीत. मला हेच प्रेम आवडते. मी अशा ठिकाणाहून आलो आहे जिथे मला माझी जागा बनवायला फार वेळ लागला. पण मुंबई इंडियन्सनेच मला खूप पाठिंबा दिला आणि असा वेडा कोणी असू शकतो का, असाच विचार त्यांनी केला. मला मनापासून खेळण्यासाठी लागणारे प्रेम त्यांनीच दिले.”
“भारत विरूद्ध इंग्लंडच्या सेमी फायनल्समध्ये आम्हाला ज्या प्रकारचे वातावरण हवे होते ते मिळाल्यावर काय घडू शकते हे आपण पाहिले आहे.”
तर आता तो त्यांचे कौतुक कोणत्या शब्दांत करेल?
“मला ‘धडकन’ हा शब्द खूप आवडतो. धडकनशिवाय तुम्ही षट्कार ठोकू शकत नाही. धडकनशिवाय तुम्ही धावू शकत नाही. धडकनशिवाय मुंबई इंडियन्स ही मुंबई इंडियन्स ठरू शकत नाही.”