पुढचे सामने: दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज– मेन इन ब्लू आता सुपर ८ मध्ये वर्चस्व गाजवायला सज्ज
टी२० वर्ल्ड कप २०२६ चे ग्रुप टप्पे आता संपले आहेत आणि खऱ्या अर्थाने धमाल सुरू होणार आहे. एमआय पलटनसाठी सुपर ८ हा मुंबई इंडियन्सची इंजिन रूम राष्ट्रीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे धडाडेल याचे एक प्रदर्शन आहे.
आपला दादा सूर्याच्या नेतृत्वाखाली, बूम बूम बुमराह, कुंग फू हार्दिक आणि टीव्ही तिलक यांच्या सपोर्टने वानखेडेवरची ही खुन्नस टीम इंडियाचे काळीज झाली आहे. या चौघांनी एक नंबर वर्चस्वाचे मिशन जिवंत ठेवले आहे आणि त्यांनी आपला मैदानावरचा जबरदस्त खेळ कायम ठेवला आहे. आमची मुंबईच्या खेळाडूंचा डीएनए लक्षात घेता टी२० वर्ल्ड कप आपण निश्चितच जिंकणार आहोत.
आता स्कायचे मेन इन ब्लू तीन कडक प्रतिस्पर्धी खेळाडूंविरूद्ध खेळणार आहेत जे ग्रुप टप्प्यांमध्ये उत्तम फॉर्ममध्ये आहेत.
आता पण आगामी सामने थोडक्यात कसे आहेत ते पाहूया आणि आपल्या वन फॅमिलीचे स्टार्स भारतासाठी हे उत्तम गेमचेंजर्स कसे खेळतील याचा अंदाज घेऊया.
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका
२२ फेब्रुवारी
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
या स्पर्धेतली सर्वांत कठीण परीक्षा आणि बॉक्स ऑफिस हिट. बूम बूम आणि क्विंटन डे कॉक यांच्यामधली भाऊबंदकी आणि त्यापाठोपाठ झकास एचपी शो तेही अहमदाबादच्या मैदानात भारतीय क्रिकेट चाहते व एमआय पलटनसाठी एक खास संडे ट्रीट ठरेल.
भारत विरूद्ध झिम्बाब्वे
२६ फेब्रुवारी
चेपॉक, चेन्नई
संयम, धोरण आणि आमच्या वचनबद्धतेचा सामना चेपॉकवर होणार आहे. या मैदानात स्पिनचा वापर जोरदार होणार असून आपला टीव्ही तिलक आपल्या कलाकारीने हे मैदान गाजवेल यात शंकाच नाही. आपला माजी एमआय स्टार ईशान किशनला विसरून कसे चालेल. तो चाबूक फटकेबाजी करण्यात माहीर आहे. भारतीय मैदानात पहिला भारत विरूद्ध झिम्बाब्वे सामना असेल.
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज
१ मार्च
ईडन गार्डन्स, कोलकाता
सुपर ८ मधला शेवटचा सामना हाय व्होल्टेज असेल यात शंका नाही. या वेळचे मिशन सोपे आहेः आपला दादा सूर्याला आपले खास सुपला शॉट्स आणि ३६० डिग्री रेंजमध्ये कॅरेबियन्सना दणाणून सोडायचे आहे. विंडीजचा संघ डेथ ओव्हर्समध्ये फटकेबाजी सुरू करेल तेव्हा बुमराहचे खास यॉर्कर्स आपले अँटीडोट्स ठरतील. या वेळी फुल पैसा वसूल मनोरंजनाची गॅरंटी आहे! ✈️