व्हीएस राजू – आंध्र प्रदेश टी२० मध्ये “मॅन ऑफ दि मोमेंट”

पलटन, आजच्या आठवड्याची सुरूवात एका सुंदर बातमीने करूया!

अलीकडेच झालेल्या आंध्र प्रदेश टी२० २०२५ आपला जलदगती गोलंदाज व्हीएस राजूने दणदणीत कामगिरी केली आहे. त्याने भीमावरम बुल्ससाठी खेळताना कडक परफॉर्मन्स दिला. त्याने सात सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आणि आपल्या टीमला क्वालिफायर २ पर्यंत नेले.

एकामागून एक प्रत्येक सामन्यात या २६ वर्षीय खेळाडूने स्वतःला गेमचेंजर म्हणून सिद्ध केले. त्याने अचूक गोलंदाजी तर केलीच पण त्याचबरोबर फलंदाजीच्या फळ्या उद्ध्वस्त केल्या आणि कठीण परिस्थितीत तणाव कायम ठेवला. त्याने अगदी शेवटपर्यंत आपल्या टीमची कामगिरी कायम ठेवली. त्याच्या गोलंदाजीने अपेक्षित परिणाम साध्य केला. त्यामुळे सामना त्याच्या टीमसाठी यशस्वी ठरला. 💪

त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे बुल्सनी विजयापासून अगदी एका पावलापर्यंत मुसंडी मारली. त्याची १३.२१ ची सरासरी सर्व गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम ठरली.

ही स्वप्नतली फिनिश थोडक्यात निसटली असली तरी राजूचे गोलंदाजीतील वर्चस्व ही सर्वोत्तम गोष्ट ठरली.

टप्पा

प्रतिस्पर्धी

आकडेवारी (ओव्हर्स)

राऊंड रॉबिन

रॉयल्स ऑफ रायलसीमा

३/२६ (३.२)

राऊंड रॉबिन

अमरावती रॉयल्स

१/३५ (४)

राऊंड रॉबिन

विजयवाडा सनशायनर्स

३/२६ (४)

राऊंड रॉबिन

तुंगभद्रा वॉरियर्स

२/१५ (४)

राऊंड रॉबिन

काकीनाडा किंग्स

२/३३ (४)

एलिमिनेटर

विजयवाडा सनशायनर्स

१/१६ (४)

क्वालिफायर २

तुंगभद्रा वॉरियर्स

२/३४ (४)