वानखेडेवरचे २०२६ मधले हिरोज: नवीन #OneFamily सुपरस्टार्सना भेटा

ऑक्शन छोटी होती पण होमवर्क जबरदस्त होता. 💥 आपण २०२६ साठी उत्सुक असताना वानखेडे आपले स्थान प्रचंड मेहनतीने कमावलेल्या नवीन खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. ते फक्त नवीन खेळाडू नाहीत तर ते एमआयचा एटिट्यूड सोबत घेऊन येतातः भरपूर स्वॅग, भरपूर मेहनत आणि पूर्ण कमिटमेंट. 

किंमत काय ते विसरून जा. या टॅलेंट्सनी अत्यंत मेहनतीने ब्लू अँड गोल्डमध्ये स्थान मिळवले आहे. 🔥 मरीन ड्राइव्हवर आतषबाजी करायला तयार असलेल्या नवीन चेहऱ्यांचे आपण स्वागत करूया.

अथर्व अंकोलेकर: लोकल बॉयचे स्वागत 🏠

बंड्या घरी परतलाय! अथर्वसाठी हे फक्त काँट्रॅक्ट नाही तर ते पूर्ण वर्तुळ आहे. बेस्ट बस कंडक्टरचा मुलगा असण्यापासून ते यू-१९ वर्ल्डकपचा हिरोपर्यंतचा (२०१९ च्या फायनलमध्ये ५/२८) आणि आता मुंबई इंडियन्सचा स्टारपर्यंतचा प्रवास खऱ्या अर्थाने मुंबई स्पिरिट आहे. 🚌💪

त्याचा फॉर्म कसा आहे: हा एक विश्वासू अष्टपैलू गोलंदाज आहे. त्याचा खेळच मैदानात बोलतो. त्याने २०२५ च्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ९ विकेट्स घेतल्या आणि राजस्थानविरूद्ध सुपर लीगच्या कठीण सामन्यात ९ चेंडूंमध्ये २६ धावा फटकावल्या. त्याने २०२५ च्या पोलिस शील्ड फायनल सामन्यात मुंबई पोलिस जिमखान्याविरूद्ध न्यू हिंदू क्रिकेट क्लबसाठी ७ व्या क्रमांकावर खेळताना त्याने नाबाद १२८ धावा करून ५/१२३ अशी कामगिरी केली. 🏏

त्याचा एक्स फॅक्टर: त्याला वानखेडेवरची रेष अन् रेष माहीत आहे. त्याचा डावखुरा स्पिन फक्त विकेट्स मिळवून देत नाही तर संध्याकाळच्या दंवाचा कसा परिणाम होतो याचे शाणा स्थानिक ज्ञानही त्याच्याकडे आहे. 🌙✨

तुम्हाला माहित्ये का? अथर्वचे वडील हे माजी कांगा लीग खेळाडू होते आणि त्यांनी अथर्वचा जन्म झाला त्या दिवशी त्याच्या पाळण्यात क्रिकेटची बॅट ठेवली होती. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे. 👶🏏

दानिश मालेवार: विदर्भाचे रन मशीन 🏎💨

या सीझनमध्ये सातत्यपूर्णता मोजायची असेल तर दानिश मालेवारचे नाव घ्यावे. वयाच्या २२ व्या वर्षी त्याने अशा इनिंग्स खेळल्या आहेत ज्याचा त्याच्या सीनियर्सचा अभिमान वाटावा.

त्याचा फॉर्म: त्याने २०२४-२५ च्या रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाला केरळवर विजय मिळवून देण्यासाठी अत्यंत संयमाने १५३ धावा केल्या. त्यानंतर २०२५ च्या दुलीप ट्रॉफी उपउपांत्य फेरीत नाबाद २०३ धावा फटकावल्या. तो इनिंगमध्ये उत्तम खेळतो. शॉर्टकट मारत नाही.

त्याचा एक्स फॅक्टर: तो प्रत्येक टी२० टीमला आवश्यक असलेला मधल्या फळीतला डाव स्थिर करणारा खेळाडू आहे. परिस्थिती थोडी कठीण होते तेव्हा तो नौका स्थिर करतो. एकदा खेळ सावरला की तो पटकन वेग पकडतो. पॉवरप्लेमधला धुमाकूळ आणि शेवटच्या ओव्हरमधल्या ड्रामा यांमधला तो एक पूल आहे. 🌉

तुम्हाला माहित्ये का? त्याने दुलीप ट्रॉफीत २०३ धावा करून निवृत्ती जाहीर केली तेव्हा असे करणारा तो विजय मर्चंट आणि गोगुमल किशनचंद यांच्यानंतरचा ८१ वर्षांतला पहिला भारतीय खेळाडू ठरला. ओल्ड स्कूल विक्रम आणि नवीन युगाचा खेळाडू. 🔥

मयंक रावत: दिल्लीची शक्ती, मुंबईचा वेग 👊⚡

प्रत्येक संघाला अशा एका खेळाडूची गरज असते जो वेळ घेण्यावर विश्वास ठेवत नाही. मयंक रावत असाच एक खेळाडू आहे.

त्याचा फॉर्म: २०२४ मध्ये डीपीएल चषक जिंकणाऱ्या ईस्ट दिल्ली रायडर्समधला एक महत्त्वाचा खेळाडू. त्याने शेवटच्या सामन्यात ३९ चेंडूंमध्ये ७८ धावांसह १९०.१३ च्या स्ट्राइक रेटने सामना संपवला आणि टीमला पुन्हा एकदा प्लेऑफ्समध्ये नेले. त्याच्याकडे मोठे सामने खेळण्याची ताकद आहे

एक्स फॅक्टर: अत्यंत उत्तम फिनिशर एनर्जी. तो येतो, बॉल बघतो, बॉलला फटके मारतो. बस्स. शिवाय त्याचा ऑफ स्पिन फक्त नावापुरता नाहीये. खासकरून डावखुऱ्या फलंदाजांसाठी हे एक घातक हत्यार आहे. आपल्याला हवे असलेले सर्वांगीण पॅकेज तो आहे. 🎯

तुम्हाला माहित्ये का? एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या डीडीसीए लीग सामन्यात सहा षट्कार मारून मयंकने आपली षट्कार ठोकण्याची शक्ती दाखवून दिली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्याने श्रेयस अय्यरच्या बीपीसीएल टीमविरूद्ध डी वाय पाटील टी२० लीग सामन्यात चार षट्कारांसह ब्लू अँड गोल्डसाठी आपण कशा प्रकारे सज्ज आहोत हे दाखवून दिले.

मोहम्मद इझर: डावखुरी तळपती वीज ⚡💎

कधीकधी ठरलेल्या मार्गापेक्षा सामना जास्त बाहेर जातो. अशा वेळी मोहम्मद इझर उपयोगी पडतो.

त्याचा फॉर्म: इझरने २०२५ स्मॅट सीझनमध्ये स्वतःचे स्थान बळकट करताना  ईडन गार्डन्सवर झालेल्या ५ सामन्यांमध्ये ९ विकेट्स घेतल्या. त्याने अत्यंत कठीण मध्य प्रदेशच्या संघाविरूद्ध ४/३९ अशी कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले. 🌬🏏

त्याचा एक्स फॅक्टर: हा एक डावखुरा जलदगती गोलंदाज असून तो १३५ च्या किमीने गोलंदाजी करतो आणि स्विंगही करतो. म्हणजेच वानखेडेवर संध्याकाळी सुटणारी हवा त्याला उपयोगी पडेल. 🦁

तुम्हाला माहित्ये का? त्याचे शेड्यूल खूप बिझी आहे. लिलावात त्याची निवड झाल्यानंतर लगेचच त्याला राज्यस्तरीय शिबिरासाठी गावाहून पाटण्याला सहा तास प्रवास करून जावे लागले. काहीही ड्रामा नाही, आवाज नाही. फक्त काम आणि काम. 🚌💨

पलटन, हे भविष्य एकदम झकास दिसते आहे. वानखेडेवर यातल्या कोणाकोणाला खेळताना पाहायला तुम्हाला आवडेल?