आम्हाला अजूनही विजयाची आस आहेः रॉबिन सिंग

आमचे फलंदाजी प्रशिक्षक रॉबिन सिंग यांनी राजस्थान रॉयल्सविरूद्ध आमच्या नवव्या सामन्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला आणि काही मुद्द्यांवर चर्चा केली.

आमच्या आत्तापर्यंतच्या सीझनबाबत मत विचारले असता रॉबिन यांनी हे मान्य केले की सीझन फार काही चांगला नव्हता.

“आम्हाला कल्पना आहे की आम्ही चांगली कामगिरी केलेली नाही. आम्ही आता परिस्थिती कशा प्रकारे दुरूस्त करू शकतो आणि चांगल्या प्रकारे शेवट करू शकतो, हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे त्याने सांगितले.

आमचे तरूण फलंदाज डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा हे या सीझनमध्ये चमकते तारे आहेत आणि रॉबिनने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

“डेवाल्ड आणि तिलक यांनी सुंदर कामगिरी केली आहे. विशेषतः तिलकने खूपच मॅच्युरिटी दाखवली आहे. आपल्या पहिल्या सीझनमध्ये हे करणे फार कठीण असते. एक तरूण खेळाडू म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करणे महत्त्वाचे असते,” असे तो म्हणाला.

आमच्या कीपर फलंदाज ईशान किशनच्या फॉर्मबद्दलही काही प्रश्न विचारण्यात आले. त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन अर्धशतके काढल्यानंतर सध्या त्याचा फॉर्म खूप चांगला नाहीये.

“आम्ही ईशानसोबत तो ज्या गोष्टींबाबत सुधारणा करू शकतो त्याबद्दल चर्चा केली आहे. आम्ही त्याच्यासोबत सामने पुन्हा पाहिले आणि मला आशा आहे की त्याने ज्या फॉर्मसोबत सुरूवात केली त्या फॉर्ममध्ये तो पुन्हा येईल,” रॉबिनने सांगितले.

फलंदाजी प्रशिक्षकांना कर्णधार रोहित शर्मा लवकरच चांगला खेळ सुरू करेल याची खात्री होती.

“फलंदाजाचा फॉर्म ही एक वैयक्तिक गोष्ट आहे. रोहितने सरावासाठी खूप वेळ दिला आहे. त्याला काय करणे गरजेचे आहे याबाबत आम्ही चर्चा केली आहे. त्याला त्याच्या जबाबदाऱ्या माहीत आहेत आणि तो लवकरच मजबूत खेळ करेल याची मला खात्री आहे,” त्यांनी सांगितले.

फलंदाजी मार्गदर्शकांनी एका सामन्यात सातत्याने चांगली कामगिरी करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या मते टी २० स्वरूपात ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट ठरली आहे.

“आम्ही एक टीम म्हणून एकत्रितरित्या कामगिरी केलेली नाही. आम्ही सामन्यांमध्ये थोडे थोडे करून चांगली कामगिरी केली आहे. आम्ही ही चांगली कामगिरी करण्याची आशा करत आहोत. सीएसकेच्या सामन्यात आम्ही खूप जवळ पोहोचलो होतो. आम्ही एका उत्तम नोटवर सामना संपवण्यासाठी तयार आहोत. आमच्याकडे अजूनही विजयाची आणि आमच्या टीमला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याची आस आहे,” असे रॉबिन यांनी शेवटी सांगितले.

सीझन कठीण असतानाही टीम चांगल्या मूडमध्ये असल्याचे दिसते आणि आम्हाला आशा आहे की ही ऊर्जा आम्ही आरआरचा ३० एप्रिल रोजी सामना करू तेव्हा फील्डवरही दिसून येईल.