INDvWI कसोटी २०२५: घरच्या खेळपट्टीवर नवे युग, पण तोच आनंद

पलटन, तयार का?!

कसोटी क्रिकेट घरच्या खेळपट्टीवर परत आले आहे आणि भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरूद्ध लढण्यासाठी पूर्ण सज्ज आहे. या वेळी नेहमीसारखीच लाल चेंडूने लढाई नसेल तर कसोटी क्रिकेट विश्वचषक २०२५-२७ मध्ये वरच्या स्तरावर जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. 📈

आपली पोरं या वर्षाच्या सुरूवातीला इंग्लंडविरूद्ध एक रोलरकोस्टर राइड आणि २-२ अशी बरोबरीत लढाई संपल्यानंतर या मालिकेत खेळणार आहेत. त्या मालिकेत प्रेक्षकांना पाचव्या दिवशी टीव्ही स्क्रीनवर चिकटून राहावे लागले होते. तो दौरा फक्त निकालांसाठीच महत्त्वाचा नव्हता तर आपले काळीज, लढा आणि नवीन शिकण्यासाठीही महत्त्वाचा होता. आणि ते शिकलेले धडे? त्यांचा वापर विंडीजविरूद्ध नक्की केला जाईल.

कर्णधार शुभमन गिल उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लिश संघाविरूद्ध केलेल्या त्या ७५४ धावा आठवतात का? त्याने त्यात अप्रतिम कामगिरी केली होती. त्याचबरोबर सिराजच्या २३ विकेट्सनी त्याला फलंदाजांसाठी दुःस्वप्न बनवले होते.

…आणि अर्थातच आपला बूम बूम बुमराह ज्याने फक्त तीन सामन्यांत तब्बल १४ विकेट्स घेतल्या. ही पोरं पुन्हा एकदा गर्जना करण्यासाठी सज्ज आहेत.

हेही वाचा 👉 India’s squad for WI Tests 📝

आता थोडं इतिहासाकडे वळूया. ऑक्टोबर २००२ पासून वेस्ट इंडिजविरूद्ध भारताने कसोटी सामन्यात एकदाही हार मानलेली नाही. एकदाही पराभूत न होता तब्लल दोन दशकं. आपण सलग नऊ कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवला असून १० मालिका आता तयार आहे. 🔥

परंतु क्रिकेटमध्ये आपण काहीही गृहित धरू शकत नाही. पाहुण्या संघाला एक विजय हवाच असेल आणि भारताला काहीही करून तो रोखावाच लागेल.

थोडक्यात सांगायचे तर ही मालिका दोन आठवड्यांसाठी चाहत्यांच्या मनावर राज्य करणार आहे. चाहते लाँग लिव्ह टेस्ट क्रिकेट असं अभिमानाने सांगणार आहेत. ✨

काय: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज, २ सामन्यांची कसोटी मालिका

कधी आणि कुठे:

पहिली कसोटी – गुरूवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ (अहमदाबाद| सकाळी ९.३० वाजता)

दुसरी कसोटी – शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५ (दिल्ली | सकाळी ९.३० वाजता)

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज: आकडेवारी

कसोटीमध्ये एकास एक आकडेवारी

भारत

संघ

वेस्ट इंडिज

२३

विजयी

३०

३०

पराभूत

२३

४७

अनिर्णित

४७

सुनील गावस्कर (२,७४९)

सर्वाधिक धावा

क्लाइव्ह लॉइड (२,३४४)

कपिल देव (८९)

सर्वाधिक विकेट्स

माल्कम मार्शल (७६)

वेस्ट इंडिजचा भारताचा दौरा २०२५ संघ

भारत: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीशन, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव

वेस्ट इंडिज: रोस्टन चेस (कर्णधार), दोमेल वॉरिकन, केवलॉन अंडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंदरपॉल, जस्टिन ग्रीव्हस, शाय होप, टेविन इमलाच, जेदिया ब्लेड्स, जोहान लायन, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खारी पायरे, जेडेन सील्स