“एमआय माझ्यासाठी काय आहे हे शब्दांत सांगू शकत नाही. ही ईश्वराने बांधलेली गाठ आहे”: कायरन पोलार्ड

पलटन, पहिल्या सामन्यात विजयी झाल्यानंतर आता पुन्हा एकत्र येऊन आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या सामन्यासाठी तयार होण्याची वेळ आली आहे. मुंबई इंडियन्स ४ एप्रिल २०२६ रोजी अरूण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. सामन्यापूर्वी आपले फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांनी एमआय चर्चेच सहभग घेतला आणि सीमारेषांपलीकडे जाऊन विविध विषयांवर चर्चा केली. 🗣️💙

पोलार्डने १५ वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई इंडियन्ससोबत खेळाडू, प्रशिक्षक तसेच पलटनचे काळीज असल्याबद्दल आणि एमआय त्याच्यासाठी काय आहे याबाबत चर्चा केली. “एमआय म्हणजे माझे दुसरे घर आहे. माझे या कॅम्पमधल्या ओळखीच्या चेहऱ्यांसोबत चांगले नाते आहे. ही टीम माझ्यासाठी काय आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही. एमआय आणि माझे नाते ईश्वराने जोडलेले आहे आणि या टीमला माझ्या काळजात खूप जागा आहे. ती तशीच कायम राहील🥹.”

एमआयने केकेआरविरूद्ध वानखेडेवर नाणेफेक जिंकून पाठलाग करण्याबाबत बोलताना पोलार्ड म्हणाले की, “हा सीझनचा पहिलाच सामना होता. काय घडेल याची कल्पना नव्हती आणि टीम बऱ्याच काळाच्या अंतरानंतर एकत्र आली होती. त्यामुळे मधल्या फळीत फलंदाजी करणे हा योग्य पर्याय होता. आम्ही २२० धावांचा पाठलाग करत होतो. परंतु पिच खूप चांगली होती आणि गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला एवढ्या धावसंख्येवर थांबवून उत्तम कामगिरी केली.” 💪

दुसऱ्या इनिंगची सुरूवात होण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये काय चर्चा सुरू आहे याबाबत बोलताना ते म्हणाले की, “मागच्या सीझनच्या अनुभवानंतर आपले १०० टक्के देऊन हा सीझन जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमची सुरूवात तुलनेने संथ असते. परंतु, ही आमची निवड नसते. काहीही झाले तरीही आम्ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. आम्ही जास्तीत जास्त सराव सामने खेळलो आणि आमच्या सर्वांची ऊर्जा एकाच दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला. आम्ही पाठलागाला उतरण्यापूर्वी थोडी चर्चा केली. हे पिच खूप चांगले आहे आणि गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला उत्तमरित्या थांबवले आहे. आता आपण आवश्यक ती कामगिरी सुरू ठेवूया आणि आपण नक्की जिंकू.

“केकेआरची ताद त्यांच्या स्पिनर्समध्ये आहे आणि वानखेडे पिचवर त्यांची ही शक्ती फारशी चांगली नाही. त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे स्पिनर्स आहेत यत शंकाच नाही परंतु आमच्याकडे त्यांच्यावर सुरूवातीपासून ताण ठेवण्याची क्षमता आहे. रोहित- रिकल्टन यांनी सुरूवात केली आणि नंतर त्याचा वेग कायम राहिला. आम्ही त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.”

केपीने अंतिमतः आपली टीम केकेआरविरूद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर त्याला किती आनंद झाला हे सांगितले. “अनेक वर्षांनी आम्ही पहिला सामना जिंकल्याबद्दल आनंद झाला. पहिल्या सामन्याचे दुष्टचक्र भेदण्यासाठी सर्वांनीच खूप मेहनत केली. दिसायला सोपे असले तरी तुम्ही जागतिक दर्जाच्या प्रतिस्पर्ध्याविरूद्ध खेळता तेव्हा हे सोपे नसते.”

मोठा माणूस, त्याचा मोठा ऑरा आणि मोठी स्वप्ने... 👑 पॉली बोलतो तेव्हा पलटन ऐकते. कारण या फक्त चर्चा नाही तर एमआयच्या खास आहेत... अगदी मनापासून आहेत! 💙