News

आला रे आला, सूर्यादादा आला!

By Mumbai Indians

पलटन, आपल्याला आता काय करायचं आहे माहीत आहे ना... आता सूर्यनमस्कार घालायचे आहेत! 

अगदी बरोबर. भारताचा स्वतःचा मिस्टर ३६० आणि आपला मुंबईचा दादा सूर्यकुमार यादव आलाय!

डिसेंबर २०२३ मध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान घोट्याला झालेल्या दुखापतीतून आता दोन वेळा आयसीसी मेन्स टी२०आय प्लेयर ऑफ दि इयर मैदानात उतरला आहे. परंतु स्काय कायमच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरूद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाचा उत्साह वाढवत असल्यामुळे त्याची कमतरता जाणवली नव्हती.

प्रतीक्षा संपली आहे. सूर्यादादा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये परतलाय आणि ३६० अंशांत फटकेबाजी पाहायला मिळेल. हा ईएसए डे आहे आणि मागच्या वर्षीचा ईएसए सामना आठवला असेल तर स्कायने एमआयचे नेतृत्व करून विजयाची चव चाखवली होती. हा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा.

त्याची देखणी फटकेबाजी, सळसळते क्षेत्ररक्षण, त्याच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि स्कायचा मैदानावरचा वावर. आम्ही तुला मिस्स केलंय!

सूर्यादादा, ब्लू अँड गोल्डमध्ये स्वागत आहे!