News

“पोलार्डने मुंबईसाठी उत्तम खेळ केला आहे, तो माझा आदर्थ आहे”: रोमारिओ शेफर्ड

By Mumbai Indians

एक खास दिवस, एक अविस्मरणीय खेळ, एक अद्वितीय निकाल- या रविवारची दुपार मुंबई इंडियन्स आणि रोमारिओ शेफर्ड यांच्या नावावर होती. 

या वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूने अगदी स्टाइलमध्ये येऊन मुंबई इंडियन्सला आपला तीन सामने हरण्याचा विक्रम मोडीत काढण्यासाठी प्रेरित केले. त्याने केलेली अप्रतिम फलंदाजी असो (१० चेंडूंमध्ये ३९ नाबाद) किंवा त्याने घेतलेली एक महत्त्वाची विकेट असो. त्याची ही कामगिरी वानखेडे स्टेडियमवर खास पाहुणे म्हणून आलेल्या १८,००० मुलांना प्रेरणादायी ठरली.

रोमारिओ १८ व्या ओव्हरच्या शेवटी फलंदाजी करायला आला. तेव्हापासून त्याने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला.

"मला माहिती होते की आज एक दोन चेंडू सामना पालटू शकतात. त्यामुळे मी विशेषतः शेवटच्या चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करण्यासाठी मैदानात उतरलो. माझे उद्दिष्ट स्पष्ट होते. मी प्रत्येक चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न केला. हे सर्व माझ्यासाठी योग्य प्रकारे पार पडले ही खूप चांगली गोष्ट होती," असे त्याने रविवारी (७ एप्रिल) सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पहिल्याच सामन्यात केलेले अद्वितीय प्रदर्शन पाहता रोमारिओला शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करायला फार आवडते का असा प्रश्न विचारला. या वेस्ट इंडियन आंतरराष्ट्रीय खेळाडूने त्याला मुद्देसूद उत्तर दिले.

“१५ व्या ओव्हरमध्ये तुम्हाला अजूनही फलंदाजी करून परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक असते. परंतु तुम्ही १७ व्या ओव्हरमध्ये किंवा त्याच्या आसपास असता तेव्हा तुम्ही फक्त स्वच्छ मनाने मैदानात उतरून स्वतःला व्यक्त करण्यासाठी प्रयत्नशील असता. तुम्ही तिथे कसलेही अंदाज बांधू शकत नाही. सामान्यतः तुम्ही ज्या चेंडूवर फटकेबाजी करता त्याचा तुमचा अंदाज चुकू शकतो. परतु, तुम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये असता आणि फक्त १८ चेंडू आहेत हे माहीत असते (त्यातले) तुम्हाला कदाचित ७, ८ किंवा ९ खेळायला मिळतात. तेव्हा जास्तीत जास्त फायदा घ्यावा लागतो आणि शक्य तितके जोरदार फटके मारावे लागतात,” तो म्हणाला.

“विशेषतः तुम्ही फिनिशिंग भूमिकेत असता तेव्हा तुमच्यावर खूप तणाव असतो कारण सर्वांनाच तुम्ही चौकार आणि षटकार फटकवावेत असे वाटत असते. कधीकधी हे घडतेसुद्धा, कधी हे घडत नाही. मग दुसऱ्या दिवशी हे घडूसुद्धा शकते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला खूप खास वाटत असते कारण तुम्ही चांगला खेळ केलात हे तुम्हाला माहीत असते.”

शेफर्डने एमआयचा फलंदाज कायरन पोलार्डसोबत केलेल्या तुलनेबाबत उत्तर देताना सांगितले की तो त्याचा आदर्श आहे आणि त्याच्या ब्लू अँड गोल्डमधल्या माजी सहकाऱ्याने केलेल्या फिनिशरच्या कामगिरीची भूमिका त्याने पार पाडलीय.

"हो, तो माझा आदर्श आहे (कायरन पोलार्ड). त्याने मुंबईसाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. मी आज असेच काहीसे केले आहे. त्यामुळे मला आज खेळायला मिळेल असे कळवण्यात आले तेव्हा त्याने (पोलार्ड) मला फलंदाजी करायला मैदानात उतरण्यापूर्वी स्वतःला व्यक्त करायला सांगितले. त्यामुळे मी कोणतेही दडपण घेतले नाही, कारण माझे फलंदाजी प्रशिक्षक आणि माझा कर्णधार हे दोघेही माझ्या पाठीशी होते. त्यामुळे मी बाहेर जाऊन जे काही करणे अपेक्षित होते ते सर्व केले.

रोमारिओ शेफर्डची एमआय कलर्समधील आजची खेळी अविस्मरणीय होती आणि ती पुढील बऱ्याच काळापर्यंत लक्षात ठेवली जाईल. एमआय त्याच्या आधीच्या आयपीएल टीमपेक्षा वेगळी का आहे याबाबत विचारले असता त्याने फॅमिली असे उत्तर दिले.

“सर्व मोठ्या आयपीएल टीम्स व्यावसायिक आहेत आणि आयपीएल एक मोठी स्पर्धा हे. एमआय कुटुंबासारखे आहे. ते सर्वांना कुटुंबासारखे वागवतात आणि सार्वजनिक स्तरावरही ते अशाच प्रकारे समोर येतात. हे आपण आज त्यांनी मुलांसाठी त्यांना हा अनुभव मिळावा यासाठी जे काही केले त्यावरून पाहू शकतो. मुलांसमोर खेळणे ही कायम आनंदाची बाब आहे. ते तुमचा उत्साह वाढवतात, प्रेरणा देतात, चांगल्या क्रिकेटला पाठिंबा देतात. त्यामुळे त्यांच्यासमोर खेळणे आणि मालक जे काही करतात ते करणे हे येणाऱ्या लहान मुलांसाठी खूप आनंददायी असते. आज त्यांना या सामन्यात उपस्थित राहून तो पाहण्याचा आनंद वेगळाच वाटला असे कारण या विकेटवर २०० धावा करणे ही छान बाब होती. शिवाय डीसीची फलंदाजीदेखील चांगली होती. त्यांनी आमच्यावर दबाव आणला परंतु बुमराने आपल्याला पुन्हा रूळावर आणले.”

कॅरेबियनमध्ये पार्टी नक्कीच सुरू झाली असेल. आज आत्ता तिकडे पहाट असल्यामुळे रोमारिओला तर नक्कीच तशी अपेक्षा असणार.

“माझ्या घरी सगळेच सामना पाहत असतील. कारण वेस्ट इंडियन खेळाडू मुंबईत खेळतोय ही खास गोष्ट आहे.”